डॉ. सागर कारंडे, डॉ. दिग्विजय चव्हाण, वैभव थांगेCrop Disease: सध्या हरभरा पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. सध्या तापमानातील अचानक वाढ आणि सिंचनाचा अभाव यामुळे पीक मूळकूज रोगास बळी पडू शकते. त्यामुळे मूळकुज रोगाची लक्षणे, कारणे आणि उपाय जाणून घेतल्यास शेतकरी वेळेत मुळकुजवर उपाय करु शकतात आणि उत्पादनातील घट टाळू शकतात..रोगासाठी अनुकूल परिस्थितीमूळकूज हा रोग प्रामुख्याने बियाण्याद्वारे आणि मातीद्वारे पसरतो. फुलोरा व शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमान व सिंचनाच्या पाण्याची कमतरता असल्यामुळे मातीतील ओलाव्याचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा कमी होते ते रोगाच्या वाढीस अनुकूल ठरते..Harbhara Mar Rog: हरभऱ्यावरील मर रोगासाठी एकात्मिक उपाय फायदेशीर.रोगाची लक्षणेहा रोग बहुतेक वेळा फुलोरा ते घाटे भरण्याच्या काळात दिसतो. शेतात ठिकठिकाणी अचानक सुकलेली रोपं दिसू लागतात. पाने व खोड फिकट पिवळ्या रंगाचे होतात. मुख्य मुळे व बाजूच्या मुळांवर तपकिरी ते काळे डाग दिसतात. मुळे ठिसूळ, कोरडी होतात आणि सडायला लागतात. बाजूची मुळे कमी होतात किंवा पूर्णपणे नष्ट होतात. काही वेळा पाने अचानक सुकतात, फक्त पिवळी न पडता थेट वाळतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास संपूर्ण शेतात रोपे सुकलेली दिसतात..मूळकूज रोगाचे व्यवस्थापनहरभरा पिकावरील मूळकुज रोगासाठी एकात्मिक व्यवस्थापन फायद्याचे ठरते. यामध्ये मुख्यत: प्रतिबंधात्मक उपाय फायदेशीर ठरतात. यामध्ये उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. रोगास प्रतिबंधक वाणांची लागवड करावी. पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. पेरणी शिफारस केलेल्या वेळेतच करावी. उगवलेली लहान रोपे जास्त उष्णतेपासून वाचवावीत. .रासायनिक उपायपेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा व्हिरिडी ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा स्यूडोमोनास फ्लोरोसेन्स १० ग्रॅम प्रति किलो बियाण्याला चोळावे.प्रोक्लोराझ ५.७ टक्के अधिक टेब्युकोनाझोल १.४ टक्के ईएस या बुरशीनाशकाची ३ मिली प्रती १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.याशिवाय रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास पिकावर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रती लिटर किंवा स्यूडोमोनास फ्लोरोसेन्स किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी २.५ किलो प्रती हेक्टर ५० किलो शेणखतासोबत वापरून द्रावण रोपांच्या बुंध्याशी ओतावे..डॉ. सागर कारंडे, वनस्पती रोगशास्त्र व अणूजीवशास्त्र विभाग, मो. ९५४५६७२२७५डॉ. दिग्विजय चव्हाण, वनस्पती रोगशास्त्र व अणूजीवशास्त्र विभाग, वैभव थांगे (पीएचडी संशोधक), अनुवंशशास्त्र आणि वनस्पती प्रजनन विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.