Farmers Advisory: यंदाच्या खरीप हंगामात अपुरा व अनियमित पाऊस झाल्यामुळे सोयाबीन उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगाम २०२७ साठी सोयाबीन बियाण्यांची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदाच्या उत्पादनातील दर्जेदार सोयाबीन बियाणे घरच्या घरी जतन करून ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले आहे. .जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गावपातळीवर शेतकरी मेळावे, प्रचार व प्रसिद्धी उपक्रमांच्या माध्यमातून या तांत्रिक सूचनांचा प्रसार करण्यात येणार आहे कृषी विभागामार्फत ‘घरचे सोयाबीन बियाणे’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी आणि क्षेत्रीय यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. उत्पादित सोयाबीन बियाण्यांची योग्य काढणी, वाळवण आणि सुरक्षित साठवणूक करण्यावर भर दिला जाणार आहे..Soybean Seeds Plan: सोयाबीन बियाणे रब्बीसाठी उपलब्ध होणार.Soybean Seeds:सोयाबीन बियाणे वाळवताना थेट कडक उन्हात ठेवू नये. बियाणे थेट पोत्यात न भरता ताडपत्रीवर किंवा स्वच्छ खळ्यावर दोन ते तीन दिवस वाळवावे. वाळवताना वेळोवेळी हाताने फेरपालट करावा. बियाण्यातील काडीकचरा, माती व खडे चाळणीच्या साहाय्याने पूर्णपणे काढून टाकावेत. स्वच्छ आणि कोरड्या ज्यूटच्या पोत्यात बियाणे भरावे. एका पोत्यात शक्यतो ६० किलोपर्यंत बियाणे ठेवावे. बियाण्यांची थररचना सात पोत्यांपेक्षा अधिक उंच करू नये. जमिनीवर ओलावा असल्यास लाकडी फळी, ताटे किंवा जुन्या पोत्यांचा आधार घेऊन त्यावर बियाण्यांची पोती ठेवावीत..Soybean Bogus Seeds : गतवर्षी तक्रारी, यंदाही त्याच कंपन्यांचे बियाणे.पोती बंद करण्यापूर्वी बियाण्यांची तापमान तपासणी करावी. काडी-कचरा, कापूस किंवा ओलसर बियाणे असलेली पोती बंद करून ठेवू नयेत. सोयाबीन बियाण्यांचे बीजावरण नाजूक असल्यामुळे हाताळणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. साठवणुकीच्या ठिकाणी छतामधून पाणी गळणार नाही आणि पावसाचे पाणी बियाण्यांपर्यंत पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी. बियाणे आणि रासायनिक खते एकाच ठिकाणी साठवू नयेत. बियाण्यांच्या पोत्यांची उंची सात फुटांपेक्षा अधिक ठेवू नये, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे..शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता तीन टप्प्यांत तपासावी. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान साठवणुकीच्या काळात, मार्चमध्ये बियाणे विक्री करताना आणि मे ते जूनमध्ये प्रत्यक्ष पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासणे आवश्यक आहे. यामुळे योग्य गुणवत्तेचे बियाणे पेरणीसाठी वापरणे शक्य होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.