Walawacha Paus Nashik 2026: गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नाशिक जिल्ह्याला बुधवारी(ता.१३) रोजी सायंकाळी वाढदिवसाच्या पूर्व मोसमी पावसाने जोरदार तडाखा दिला. येवला आणि निफाड तालुक्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काढणीला आलेल्या उन्हाळ कांद्यासह द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे..येवला शहर आणि परिसरात सायंकाळी साडेपाचनंतर अचानक आभाळ भरून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शहरासह सावरगाव, बाभूळगाव, धानोरे, अंगणगाव, जळगाव नेऊर, एरंडगाव आणि मुखेड परिसरात पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या..Pre Monsoon Rain: पश्चिम विदर्भात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी.सावरगाव-पाटोदा मार्गावर ठाणगाव जवळ मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी श्रमदान करून हे झाड बाजूला केले. पावसासोबत सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. शेतात काढून ठेवलेला आणि चाळीत भरण्यासाठी सज्ज असलेला उन्हाळ कांदा या पावसात भिजला..कांदा झाकण्यासाठी टाकलेले कागद वाऱ्यामुळे उडून गेल्याने कांदा, चारा आणि जनावरांचा भुसा ओला झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील शिरवाडे, वाकद, देवगाव, कानळद आणि मानोरी परिसरातही सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वळवाच्या पावसाने रौद्र रूप धारण केले..Pre Monsoon Farming Tillage: मॉन्सूनपूर्व मशागतीला वेग.दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असतानाच सायंकाळी अचानक काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक आणि द्राक्ष बागायतदारांना बसला. वाऱ्यामुळे द्राक्षबागांच्या काड्या मोडल्या असून बागांचे नुकसान झाले आहे. तसेच, जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे..या अवकाळी संकटामुळे ठिकठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. येवला शहरात मनमाड रोडवर विजेची तार तुटून पडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तर विखरणी उपकेंद्रातून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता. बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.