उद्धव मुटकुळे, डॉ. प्रीती देशमुख, ज्योती खराडेSugarcane Farming: पूर्वहंगामी ऊस लागवड ही जास्त उत्पादन देणारी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. त्यासाठी योग्य वेळेत लागवड, सुधारित वाण निवड, बेणेप्रक्रिया, सेंद्रिय व रासायनिक खतांचे शास्त्रीय व्यवस्थापन, पाणी व तण नियंत्रण तसेच कीड-रोग नियंत्रणावर भर दिल्यास उसाची वाढ जोमदार होते. .महाराष्ट्रात ऊस हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. उसाची लागवड ही आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरु हंगामात केली जाते. यामध्ये पूर्वहंगामी ऊस लागवड ही उत्पादन व साखर उत्पादनाच्या दृष्टीने सर्वात फायदेशीर मानली जाते. पूर्वहंगामी लागवड साधारणतः ऑक्टोबरच्या शेवटी ते नोव्हेंबर अखेर केली जाते. या काळातील हवामान उसाच्या फुटव्यांच्या वाढीस पोषक असते..योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास पूर्वहंगामी उसाचे प्रति हेक्टरी सुमारे १५० ते २०० टन पर्यंत उत्पादन मिळविणे शक्य होते. पूर्वहंगामी ऊस लागवड यशस्वी करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत, सुधारित जातींची निवड, बेणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन या सर्व बाबींचे शास्त्रीय पद्धतीने अवलंब करणे आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनामुळे ऊस उत्पादनात भरघोस वाढ मिळण्यास मदत होते..पूर्वहंगामी ऊस लागवडीचे महत्त्वपूर्वहंगामी ऊस लागवड ही शास्त्रीय व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. अधिक ऊस आणि साखर उत्पादन तसेच कारखान्याच्या गाळपाची लवकर सुरुवात या दृष्टीने पूर्वहंगामी लागवडीला जास्त प्राधान्य दिले जाते. हा ऊस १३ ते १४ महिन्यांत म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या थंडीच्या महिन्यात गाळपास येतो, त्यामुळे या उसाचा साखर उतारा जास्त मिळतो. तसेच पूर्वहंगामी ऊस वेळेत तुटून गेल्यामुळे खोडवा चांगला घेता येतो..ऊस लागवडीचा कालावधीपूर्वहंगामी ऊस पिकाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीतच करावी. नोव्हेंबरनंतर लागण झाल्यास थंडीमुळे उसाच्या उगवणीवर विपरीत परिणाम दिसून येतो. व त्यामुळे फुटव्यांची संख्या अपेक्षित येत नाही..Sugarcane AI Farming: ऊस पिकासाठी AI चा वापर, शेतकऱ्यांच्या अनुदानात दुपटीने वाढ, 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट'चा निर्णय, काय आहे ही योजना?.पूर्वमशागतजमिनीची उभी, आडवी नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वमशागत खोल आणि चांगली झाल्यास मुळाची वाढ चांगली होऊन अन्नद्रव्ये शोषली जातात. तसेच दर तीन ते चार वर्षांनी एकदा सबसॉयलरचा वापर करावा..ऊस रोपांची लागवडसद्यःस्थितीत अति पावसामुळे भारी जमिनीत वापसा लवकर येत नाही. त्यामुळे उसाची रोपे तयार करून रोपांची लागवड करावी. रोपांची लागवड केल्यास फुटव्याची वाढ एकसमान होऊन पक्व उसाची संख्या जास्त मिळते. ऊस लोळणे व पडण्याचे प्रमाण कमी होते. ऊस रोपांची लागण करताना दोन रोपांतील अंतर १.५ फूट, २ फूट किंवा २.५ फूट आणि सरीमधील अंतर ४, ४.५ आणि ५ फूट ठेवता येते..बेणे निवडबेणे मळ्यात वाढविलेले ९ ते ११ महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ मिळते. ऊस बेणे लागवड करण्यापूर्वी बेणेप्रक्रिया अवश्य करावी. यामुळे बुरशीजन्य रोग आणि किडीचा बंदोबस्त होतो..लागवड पद्धतउसाची लागण मध्यम ते भारी जमिनीमध्ये करताना कोरडी किंवा वाफशावर करावी. हलक्या जमिनीत ओली लागवड करावी. पारंपारिक लागण पद्धतीमध्ये सुधारणा करून मध्यम ते भारी जमिनीमध्ये रुंद सरी पद्धतीने दोन सरींत ४ फूट (१२० सेंमी), ४.५ फूट (१३५ सेंमी), ५ (१५० सेंमी), ५.५० (१६५ सें.मी.) किंवा ६ (१८० सें.मी.) इतके अंतर ठेवता येते.जोडओळ पट्टा पद्धतीने लागवड करताना २.५ फूट बाय ५ फूट (७५ ते १५० सेंमी) किंवा ३ बाय ६ फूट (९० ते १८० सेंमी) याचा अवलंब करावा..लागवड केलेल्या उसात जास्त नांग्या पडल्यास पाण्याच्या पाटात कटाच्या शेजारी जास्त टिपरी लावून त्याचा वापर नांग्या भरण्यासाठी करावा. किंवा लागणी अगोदर पंधरा दिवस प्लास्टिकच्या पिशवीत अथवा पॉली ट्रे मध्ये एक डोळा पद्धतीने रोपे तयार करावेत. लागणीनंतर एक महिन्यात नांग्या भराव्यात..लागवडीसाठी जातीपूर्वहंगामी ऊस लागवड करण्यासाठी उसाच्या जास्त साखर उतारा असणाऱ्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची निवड करावी. ऊस लागवडीसाठी कोसी ६७१, कोव्हीएसआय ४३४, कोएम ११०८२, एमस १०००१, को ८६०३२, कोव्हीएसआय १८१२१, पीडीएन १५०१२, पीडीएन १५००६, पीडीन १३००७, व्हीएसआय ०८००५, कोएम ०२६५ या जातींचा वापर करावा..Sugarcane Farming: ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी .सेंद्रिय खत व्यवस्थापनपूर्वहंगामी उसामध्ये पहिली फणपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून रोटाव्हेटरच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर ऊस लागणी अगोदर राहिलेले एकरी ५ टन शेणखत आणि रासायनिक खताचा पहिला हप्ता लागणीच्या सरीमध्ये मातीत मिसळावा. शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडी खत, कारखान्यावर उपलब्ध असलेले बायोकंपोस्ट, फर्मेटेड ऑरगॅनिक मॅन्युअर अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात. हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडणे हा सेंद्रिय खतांचा पुरवठा करण्यासाठी उत्तम पर्याय आहे..रासायनिक खतांचा वापरपूर्वहंगामी हंगामातील ऊस पिकाचा कालावधी हा १३ ते १४ महिन्यांचा असतो. उत्पादकता ही जास्त असल्यामुळे अन्नद्रव्यांची गरज सुद्धा जास्त असते. पूर्वहंगामी ऊस पिकास हेक्टरी ३४० किलो नत्र, १७० किलो स्फुरद व १७० किलो पालाशची वापरण्याची शिफारस आहे.उसासाठी रासायनिक खतमात्रेची शिफारस केली असली तरी माती परीक्षण केल्यानंतर खतमात्रेत योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. माती परीक्षण केल्यामुळे जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थितीची माहिती मिळते. त्यानुसार रासायनिक खतांचे नियोजन करणे सोयीचे होते.उसाच्या को ८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीस अन्नद्रव्यांची गरज ही जास्त असते. त्यामुळे या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची मात्रा २५ टक्के जास्त म्हणजे ४०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १७० किलो पालाश प्रति हेक्टरी याप्रमाणे यावे..रासायनिक खतांचा पहिला हप्तालागवडीच्या वेळी १० टक्के नत्र मुळाच्या व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद आणि पालाश प्रत्येकी ५० टक्के देणे फायदेशीर ठरते.खतांचा दुसरा हप्ता आणि बाळबांधणीलागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी बाळबांधणी पॉवर टिलरच्या साहाय्याने करावी. फुटवे दिसायला लागल्यानंतर फुटव्यांची वाढ अधिक जोमदार होण्यासाठी नत्र खताची ४० टक्के मात्रा द्यावी. उसाच्या फुटव्याला ३ इंच ते ४ इंच (७.५ ते १० सेंमी) माती लावावी. बाळबांधणी केल्यामुळे खताची मात्रा मातीत गाडली जाते. उसाच्या बुडाला मातीची हलकीशी भर दिली जाते, त्यामुळे फुटवा चांगला फुटतो आणि जोमदार वाढ होते..तिसरा हप्ताऊस पीक १२ ते १४ आठवड्यांचे झाल्यानंतर कांड्या सुटण्यास सुरुवात होते. त्यावेळी नत्रयुक्त खताचा तिसरा हप्ता म्हणजे शिफारशीच्या १० टक्के नत्राची मात्रा द्यावी. अवजारांच्या साहाय्याने खत पेरणी करावी किंवा खत उसाच्या बुडाला देऊन तीन दातेरी अवजार चालवावे.खतांचा शेवटचा हप्ता व मोठी बांधणीलागणीनंतर ३.५ ते ४ महिन्यात उसाची पक्की बांधणी करून घ्यावी. मोठी बांधणी करताना प्रथम शिफारशीप्रमाणे नत्रयुक्त खताची ४० टक्के, स्फुरद व पालाशची उर्वरित प्रत्येकी ५० टक्के मात्रा उसाच्या बुडाला देऊन तीने दातेरी अवजार चालवून मखत मातीआड करावे. त्यानंतर रिजरने बांधणी करावी..ऊस पिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्वऊस पिकासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यासह कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम आणि लोह, जस्त, मँगेनीज, तांबे, बोरॉन, क्लोरिन आणि मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील महत्त्वाची आहेत. पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज ही कमी असली तरी या अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे आवश्यक असते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटद्वारे विकसित व्हीएसआय मल्टिमायक्रोन्युट्रीयंट आणि मल्टिमॅक्रोन्युट्रीयंट या द्रवरूप खताची एकरी प्रत्येकी २ लिटर २०० लिटर पाणी या प्रमाणात एकत्रित पहिली फवारणी लागणीनंतर ६० दिवसांनी आणि ३ लिटर ३०० लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी ९० दिवसांनी केली असता उत्पादनात वाढ मिळते..सिलिकॉनचा वापरअधिक ऊस व साखर उत्पादन घेण्यासाठी लागणीच्या वेळी (४०० किलो सिलिकॉन) १.५ टन बगॅसच्या राखेमध्ये २.५ लिटर प्रति हेक्टरी सिलिकेट विरघळविणाऱ्या द्रवरूप समूह खतांची शिफारस केली आहे.जिवाणू खतेजमिनीची सुपीकता आणि उत्पादकता शाश्वत ठेवण्यासाठी जैविक खतांचा वापर आवश्यक आहे. त्यामध्ये नत्र स्थिर करणारे जिवाणू, स्फुरद विरघळविणारे जिवाणू, पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू गंधक आणि सिलिकॉन उपलब्ध करून देणारे जिवाणूंचा वापर करणे फायदेशीर ठरते.- उद्धव मुटकुळे, ७७६८९ ९७८५८- डॉ. प्रीती देशमुख, ९९२१५ ४६८३१(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बु), जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.