Kharif Season: खानदेशात पूर्वहंगामी (बागायती) कापूस लागवडीला वेग आला असून या आठवड्यात बहुतांश भागांतील लागवड पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. यंदा पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत स्थिर राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. .लागवड झालेल्या क्षेत्रात सध्या सिंचनाची लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पहिला खताचा डोसही दिला असून त्यामुळे पिकाची वाढ समाधानकारक राहील, अशी अपेक्षा आहे..Pre Season Cotton Cultivation: खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू .खानदेशात यंदा सुमारे सव्वालाख हेक्टर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हलक्या व अधिक पाणी वापराच्या जमिनीत तणांची वाढ दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत तणनियंत्रणाची कामे सुरू होतील. मात्र कापूस क्षेत्र मोठे आणि मजुरांची उपलब्धता मर्यादित असल्याने अनेक शेतकरी तणनाशकांच्या वापराकडे वळण्याची चिन्हे आहेत..सध्या तणनियंत्रणासाठी एकरी सुमारे १,२०० रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी सांगतात. बाजारात १५ दिवसांपासून एक महिन्याच्या कापूस पिकासाठी परिणामकारक तणनाशके उपलब्ध झाली आहेत. काही कंपन्यांनी दीड महिन्याच्या पिकासाठी एकरी ४०० ते ५०० रुपये खर्चातील तणनाशकेही उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे तणनाशकांचा वापर वाढण्याची शक्यता आहे..Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू.दरम्यान, खतांचा वापर सुरू असतानाच काही भागांत युरियाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी आगाऊ खतसाठा करत असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने मात्र युरियाचा अतिरेकी किंवा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन केले आहे..उष्णतेची तीव्रता कायम असल्याने बागायती कापूस पिकाला नियमित सिंचन करावे लागत आहे. विशेषतः काळ्या कसदार जमिनीत दररोज एक ते दोन तास पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे..मे महिन्यात लागवड मंदावलीयंदा मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे पूर्वहंगामी कापूस लागवडीचा वेग मंदावला होता. मात्र जूनच्या सुरुवातीपासून लागवडीला गती मिळाली आहे. चोपडा, यावल, जामनेर, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर आणि जळगाव तालुक्यांत पूर्वहंगामी कापूस लागवड अधिक प्रमाणात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा सुमारे ८० ते ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापूस लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.