Weather Impact: धाराशिव जिल्ह्याच्या भागामध्ये गुरुवारी (ता. दोन) पहाटे निसर्गाच्या लहरीपणाचा तडाखा बसला. बहुतांश तालुक्यात विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे..तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई परिसरात पहाटेच्या सुमारास वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..Marathwada Agriculture Loss: मराठवाड्यात तीन दिवसांत ५३४५ हेक्टरवर नुकसान.फळबागा, रब्बी पिकांचे नुकसानजिल्ह्यात झालेल्या या पावसामुळे सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. विशेषतः आंबा बागांतील परिपक्व होऊ लागलेल्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात गळून पडल्या आहेत. कळंब तालुक्यातील बहुला परिसरातही जोरदार वारे आणि पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतात काढून ठेवलेली ज्वारी आणि गहू ही पिके भिजल्याने ती काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्वारीचा कडबा भिजल्याने त्याची प्रत खालावणार आहे..Agriculture Loss: नुकसान मोठे आहे, तातडीने आर्थिक मदत द्या.ऊन-सावलीचा खेळ अन् हवेत गारवागुरुवारी पहाटे पाऊस झाल्यानंतर सकाळपासूनच जिल्ह्यावर ढगांची गडद छाया पसरली होती. दिवसभर कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण असा ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. या बदललेल्या हवामानामुळे आणि पहाटेच्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे कडक उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना या गारव्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र ‘नुकसानी’चे पाणी तरळले..तालुकानिहाय पावसाची हजेरीउमरगा ः बुधवारी मध्यरात्रीपासूनच येथे पावसाने जोर धरला होता.भूम, परंडा, वाशी व धाराशिव : काही ठिकाणी हलक्या, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.लोहारा : तालुक्यात हलका पाऊस झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.