Heavy Rainfall Today: नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळित केले. शुक्रवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास येवला, चांदवड, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यांना वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांसह झालेल्या पावसाने झोडपून काढले. .या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, येवला तालुक्यात घरांची पडझड होऊन एका चार वर्षीय बालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक आलेल्या या संकटामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून, नागरिकही हवालदिल झाले आहेत..Weekly Weather: कमाल आणि किमान तापमानात घट सुरू.सिन्नर तालुक्यातील शहा महसूल मंडळात ६५.५ मिमी पावसाची नोंद झाली. भर उन्हाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी वाहू लागले. पूर्व भागातील शहा, वावी, पाथरे व परिसरात रात्री आठच्या सुमारास झालेल्या पावसामुळे काढणीला आलेला तसेच शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली..दुसरीकडे, येवला तालुक्यातील बोकटे येथे वादळाचा मोठा फटका बसून शेतकरी बापूसाहेब दाभाडे यांची दोन एकर केळीबाग पूर्णपणे जमीनदोस्त झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, शेतातील विहिरींवर बसवलेले सौर कृषी पंपांचे पॅनेल्सही उडून गेले. तसेच अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने येवला, मनमाड आणि सिन्नर परिसरातील वीजपुरवठा तासनतास खंडित झाला होता..Monsoon 2026: मॉन्सून प्रगतिपथावर.मनमाड आणि नांदगाव परिसरात सुमारे ४५ मिनिटे झालेल्या वादळी पावसामुळे सखल भागात पाणी साचले. त्यामुळे बाजारपेठेत नागरिकांसह भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडाली. चांदवड तालुक्याच्या पूर्व भागातील रायपूर, दिघवद, दुगाव आणि शिंगवे महसूल मंडळांमध्येही पावसाचा जोर कायम होता. अचानक आलेल्या पावसामुळे उघड्यावर ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. काही ठिकाणी जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा देखील भिजल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले..वादळाचा फटका शेतीसोबतच घरांनाही बसला. देवळाणे (ता. येवला) येथे अचानक आलेल्या तीव्र वादळामुळे बबन जाधव यांच्या घराचे छत कोसळले. या दुर्घटनेत कडूबाई जाधव, ठकूबाई पगारे आणि चार वर्षीय आयुष जाधव हे तिघेजण गंभीर जखमी झाले..माजी खासदार छगन भूजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षामार्फत जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याचे तसेच शासनाकडून घर दुरुस्तीसाठी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.