Crop Loss Due to Weather Changes: यंदा सोलापूर जिल्ह्यात गव्हाच्या पेरणी व उत्पादनात वाढ झाली असली, तरी अवकाळी पावसामुळे गव्हाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मात्र, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची आवक आणि दर सध्या स्थिर आहेत..सोलापूर बाजार समितीत स्थानिक गव्हासह मध्य प्रदेश, गुजरात आणि पंजाब येथूनही गव्हाची आवक होत आहे. सध्या बाजार समितीत गव्हाला प्रतिक्विंटल २,९०० ते ३,९५० रुपये दर मिळत आहे. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी गव्हाचा दर्जा घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे..Agriculture Crisis: उत्तर महाराष्ट्रातील शेती संकटात.यंदा जिल्ह्यात ७१ हजार ५२९ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. जिल्ह्याचे सरासरी गहू क्षेत्र ४८ हजार ८८ हेक्टर असून, त्या तुलनेत यंदा पेरणीची टक्केवारी १४९ टक्क्यांवर पोचली आहे. हेक्टरी उत्पादनातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, अवकाळी पावसामुळे त्या आनंदावर पाणी फिरले आहे..Hailstorm Crop Damage : गारपीटग्रस्त कांदा पिकासाठी उपाययोजना.दरात प्रतिकिलो १० रुपयांचा फरकबाजारात गव्हाची विक्री प्रतिकिलो २९ ते ३९ रुपये दराने होत आहे. अवकाळीमुळे खराब झालेल्या आणि चांगल्या प्रतीच्या गव्हाच्या दरात सुमारे १० रुपयांचा फरक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले..बाजारात गव्हाची आवक सध्या स्थिर आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात माल खराब झाला आहे. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल २,९०० ते ३,९५० रुपये दर मिळत आहे. गव्हाचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज आल्यानंतरच भविष्यातील दरांबाबत स्पष्ट चित्र समोर येईल.अशोक संकलेचा, अडत व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.