Unseasonal Rain Crop Damage : पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यांत पुन्हा एकदा पूर्वमोसमी पावसाने आणि वादळाने जोरदार हजेरी लावली. गेल्या चार दिवसांत दोनदा झालेल्या या नैसर्गिक संकटामुळे गहू, हळद आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे..तेल्हारा तालुक्यात गव्हाचे नुकसानअकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे गहू आडवा झाल्याने उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती आहे. विशेष म्हणजे, सध्या या भागात कलिंगडाचा हंगाम जोरात आहे. मात्र, पावसामुळे फळांच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीतून हात आखडता घेतला आहे. आधीच दरात घसरण असताना आता पावसामुळे कलिंगड उत्पादकांची झोप उडाली आहे..Pre-Monsoon Rains : मॉन्सून पूर्व पावसाने सिंधुदुर्गसह ठाण्याला भिजवलं.मेहकरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊसबुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह सुमारे पाऊण ते एक तास जोरदार पाऊस बरसला. या अवकाळी संकटामुळे हाताशी आलेला गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उन्हाचा तडाखा वाढत असताना अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात बदल झाला असला, तरी शेतीचे गणित मात्र विस्कटले आहे..Pre-Monsoon Rains : छ. संभाजीनगरला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; ८ पशूधन दगावले, ३५ कुटुंबाचा संसार आला उघड्यावर.मालेगाव तालुक्यात हळद उत्पादकांची पळापळवाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यासह परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या या भागात हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अनेक शेतकऱ्यांनी हळद उकळून वाळवण्यासाठी उघड्यावर टाकली होती. .अचानक पाऊस सुरू झाल्याने ही हळद सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी किंवा ताडपत्रीने झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे काही ठिकाणी हळद ओली झाली असून, गव्हाच्या पिकालाही फटका बसला आहे. या सततच्या बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.