Weather Impact: नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने अक्षरशः कहर केला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसासोबतच जोरदार वादळी वारे वाहत असल्याने बागायती पिकांसह ज्वारी, हरभरा, कापूस ही पिके आडवी पडून उध्वस्त झाली आहेत..बुधवारी (ता. १) सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. या दरम्यान लोहा तालुक्यातील सायाळ येथे वीज कोसळून मोठी दुर्घटना घडली. .Pre-Monsoon Rains: पश्चिम विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा धुमाकूळ.येथील शेतकरी आनंदा रामजी मोरतळे यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीवर वीज पडून ती पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत जनावरांसाठी वर्षभरासाठी साठवून ठेवलेला चारा नष्ट झाला असून संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. .ज्वारी, हरभरा व कापूस ही पिके जमिनीवर आडवी पडल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले असून आंबा, पेरू यांसारख्या झाडांची पडझड झाली आहे. .Ahilyanagar Pre Monsoon Rains : मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.याशिवाय शेतातील सोलार पंप व सोलार यंत्रणा वादळामुळे उखडून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही भागांत शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने जनावरांचेही हाल झाले आहेत.विशेष म्हणजे २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोलार यंत्रणांना पुन्हा एकदा फटका बसला आहे..दरम्यान, या पूर्वमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरीपुन्हा संकटात सापडला असूननुकसानग्रस्त भागांचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.