Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात महावितरणने वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली. यात जवळपास तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा चालू महिन्यात खंडित करण्यात आला. .वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणसमोर अडचणी निर्माण झाल्या. छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण व जालना या तीनही मंडळांत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक व इतर वर्गवारीतील चार लाख ३४ हजार ४४० ग्राहकांकडे २८२ कोटी ८७ लाख रुपयांची थकबाकी आहे. .Power Supply Disconnection: ३४ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित .यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात एक लाख १७ हजार ७७१ ग्राहकांकडे ६३ कोटी ४४ लाख, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळात एक लाख ८२ हजार ५४ ग्राहकांकडे ६९ कोटी ६० लाख, तर जालना मंडळातील एक लाख ३४ हजार ६१५ ग्राहकांकडे १४९ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणने आता थकबाकीदारांची वीजजोडणी खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली. या महिन्यात जालना मंडळातील १,६११ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला..Power Supply Disconnection: मोहोळ तालुक्यातील १२ गावांचा वीजपुरवठा अद्याप खंडित....तर गुन्हे दाखल होणारथकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. काही संवेदनशील भागांत कर्मचाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, ही कारवाई पोलिस बंदोबस्तात केली जाणार आहे. मोहिमेत अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे..रिकनेक्शनचा भुर्दंड टाळामहावितरणने आपले वीज कनेक्शन तोडण्याची वाट न पाहता ग्राहकांनी चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकीची रक्कम विनाविलंब भरून सहकार्य करावे. थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास बिलाच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी ३१० रुपये, तर थ्री फेज जोडणीसाठी ५२० रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते..महावितरणतर्फे सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी तातडीने थकीत वीजबिल भरणे नियमाने गरजेचे आहे; अन्यथा महावितरणचे कर्मचारी त्यांचा वीजपुरवठा खंडित करू शकतात. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण, छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.