Baramati News: ‘महावितरण’ने वीजबिल थकबाकी वसुली मोहीम अधिक गतिमान करत बारामती परिमंडलात थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील सुमारे ५ लाख २२ हजार ग्राहकांकडे एकूण १०६ कोटी २२ लाख रुपये वीजबिलांची थकबाकी आहे. चालू डिसेंबर महिन्यातच १० हजार ३७८ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे..परिमंडलनिहाय थकबाकीत बारामती मंडलातील १ लाख १८ हजार ग्राहकांकडे २७ कोटी ६५ लाख, सातारा मंडलातील १ लाख ७७ हजार ग्राहकांकडे २३ कोटी ८० लाख, तर सोलापूर मंडलातील २ लाख २७ हजार ग्राहकांकडे ५४ कोटी ७६ लाख रुपये थकित आहेत. थकबाकीपोटी बारामती मंडलातील २७०२, सातारा मंडलातील ७७८ आणि सोलापूर मंडलातील ५४९० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे..Agriculture Electricity Issue: खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी मेटाकुटीस.विभागनिहाय पाहता, बारामती विभागात ४२९७३ ग्राहकांकडे ८ कोटी ५२ लाख, केडगाव विभागात ५०९७८ ग्राहकांकडे १४ कोटी ८१ लाख, तर सासवड विभागात २४६२९ ग्राहकांकडे ४ कोटी ३१ लाख रुपये थकित आहेत. सातारा मंडलातील कराड विभागात ४६३६३ ग्राहकांकडे ५ कोटी ८५ लाख, फलटण विभागात ३६३५१ ग्राहकांकडे ५ कोटी ४५ लाख, सातारा विभागात ४२९९६ ग्राहकांकडे ५ कोटी २८ लाख, वडूज विभागात २९३८० ग्राहकांकडे ४ कोटी ४८ लाख, तर वाई विभागात २१९३९ ग्राहकांकडे २ कोटी ७३ लाख रुपये थकबाकी आहे..Madha Electricity Project: माढ्यातील विजेच्या कामासाठी १.८८ कोटी मंजूर.सोलापूर मंडलातील अकलूज विभागात २०२६७ ग्राहकांकडे ४ कोटी ४७ लाख, बार्शी विभागात ४४२१५ ग्राहकांकडे ११ कोटी ९२ लाख, पंढरपूर विभागात ३९९५० ग्राहकांकडे ७ कोटी ८९ लाख, सोलापूर ग्रामीण विभागात ६१४८६ ग्राहकांकडे १६ कोटी २२ लाख, तर सोलापूर शहर विभागात ६१७६० ग्राहकांकडे १४ कोटी २४ लाख रुपये थकित असल्याची माहिती महावितरणने दिली..थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित झाल्यास पुनर्जोडणीसाठी सिंगल फेजसाठी ३१० रुपये, थ्री फेजसाठी ५२० रुपये तसेच त्यावर जीएसटी वेगळा आकारण्यात येतो. पुर्नजोडणी शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ग्राहकांनी चालू व थकित वीजबिले तत्काळ भरून वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.