Solapur News: सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे १५ ते २४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सोलापूर मंडळातील एकूण ९५ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणच्या प्रयत्नातून यापैकी ७४ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले असून उर्वरित २१ गावांचा पुरवठा पुढील दोन दिवसांत पुन्हा सुरळीत होणार असल्याचं सांगण्यात आले..पुरामुळे करमाळा, मोहोळ, माढा, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील १९ उपकेंद्रांपैकी अनेक ठिकाणी वीजवाहिन्या व पोल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ९२ वीजवाहिन्यांचा पुरवठा बंद होऊन २८ हजार ५९ घरगुती तसेच ३९ हजार ४१ शेतीपंप ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता..Maharashtra Flood Condition: अतिवृष्टीने सारेच हिरावले, आम्ही जगायचे कसे?.याशिवाय ५ हजार ६०४ रोहित्रे पाण्याखाली गेल्याने महावितरणचे अंदाजे २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मोठ्या आव्हानांचा सामना करूनही महावितरणच्या अभियंत्यांनी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून गावठाण भागातील वीजपुरवठा लवकरात लवकर पुन्हा सुरू केला. काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांनी बोटीच्या साहाय्याने पाण्यात उतरून काम केले. मोहोळ–भांबेवाडी परिसरात २५ फूट पाणी असतानाही कर्मचाऱ्यांनी बोटीने पोलपर्यंत जाऊन दुरुस्ती केली..Nanded Flood Rescue: एसडीआरएफकडून २१ पूरपीडितांचा बचाव .अक्कलकोट तालुक्यातील मोटयाळ गावातील वायरमन यांनी नदीत पोहून झाड हटवून वीजपुरवठा सुरळीत केला. पूरकाठावरील काही गावांमध्ये २५ सप्टेंबर रोजी पाणी पुन्हा वाढल्याने वीजपुरवठा बाधित झाला होता. तरीही महावितरणने २४ तासांच्या आत तो पुन्हा सुरू केला. सध्या २१ गावांचा पुरवठा अद्यापही बंद असून, पाणी ओसरताच रोहित्रे व पोलांची देखभाल करून वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे. .या कामासाठी महावितरणचे २६२ कंत्राटदार मनुष्यबळ व साहित्यांसह काम करत आहेत. लवकरात लवकर अन्य गावांचाही वीजपुरवठा सुरळीत करू.सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.