Power Supply Cut: छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील तब्बल ८१ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणने गेल्या महिनाभरात खंडित केला. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे..सद्यःस्थितीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांकडे अद्यापही २२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच उभारलेला आहे. वीजबिलांच्या वसुलीमधूनच महावितरणला वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसुलीला मोठा वेग देण्यात आला आहे. .Power Supply Disconnection: अकोला विभागातील २९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित.मुख्य अभियंता पवनकुमार कछोट हे स्वतः परिमंडलात विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत. थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ''ऑन फिल्ड'' आहेत. एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे..Power Supply Disconnection: छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील २२ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित.यासोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची विभाग, मंडल व परिमंडल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. थकबाकीदार हा शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास दोघांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे..थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी या महिन्यात सुटीच्या दिवशीही महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. यासह घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना mahadiscom.in ही वेबसाइट व मोबाईल ॲपद्वारे ''ऑनलाइन'' सोय उपलब्ध आहे. वीज ग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.....अशी आहे थकबाकीछत्रपती संभाजीनगर शहर मंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ९८ हजार ८९९ वीज ग्राहकांकडे ४७ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात गेल्या महिनाभरात १८ हजार ७९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील १ लाख ४८ हजार ४६४ वीज ग्राहकांकडे ४६ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. ग्रामीण मंडलात ३७ हजार ४५५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच जालना मंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील १ लाख १२ हजार ३८७ वीज ग्राहकांकडे १२८ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी आहे. जालना मंडलात २६ हजार २६७ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या महिनाभरात खंडित करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.