Ahilyanagar News : सत्ता येते, जाते. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला येत नाही. मात्र मी जेव्हा जेव्हा सत्ते आहे. तेव्हा शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या हिताचा विचार करत असतो. मी शब्दाचा पक्का आहे. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. .शेतीत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे. आम्ही बारामतीत ऊसशेतीत यशस्वीपणे एआयचा वापर केला आहे. शेतीत एआयच्या वापरासाठी अर्थसंकल्पात पाचशे कोटींची तरतूद केल्याचे ते म्हणाले.श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथे शुक्रवारी (ता. २९) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मेळावा झाला. अजित पवार म्हणाले, की शेतीत एआय तंत्रज्ञान वापरल्याने पाण्याची व खतांची बचत होते. .Ajit Pawar: इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो; पवार.शिवाय, उत्पादन वाढीत मोठा फायदा होतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीत या तंत्रज्ञानाचा वापर करावा. साखर कारखान्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. डिंभे ते माणिकडोह बोगद्याची मागणी होत आहे. त्यावर काही मतमतांतरे आहेत, त्याबाबत चर्चा करून तोडगा काढू. श्रीगोंद्याचे सगळे नेते माझ्याकडे आले. झालं गेलं सोडून एकत्र येण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. कुकडी पाणीप्रश्न, साखर कारखान्यांसमोरील अडचणी, प्रस्तावित प्रदूषणकारी प्रकल्प यामध्ये मदत करण्याची भूमिका मांडली..आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. भावनेने, जाती-धर्मात तेढ निर्माण करुन प्रश्न सुटत नसतात. आम्ही सर्वधर्म समभाव जपणारा आमचा पक्ष आहे. यावेळी स्थानिक नेत्यांनी घोड-कुकडीच्या लाभधारक शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होतो. त्यासाठी डिंभे ते माणिकडोह बोगद्याची नितांत गरज आहे. .Ajit Pawar: चांगल्या अधिकाऱ्यांची प्रशासनात गरज: अजित पवार.साकळाई योजनेला गती मिळाली पाहिजे. औद्योगिक वसाहत उभारणीची प्रक्रिया गतिमान व्हावी. श्रीगोंदेकरांची मुंबईत मोठमोठी भाषणे होतात, मात्र, पनीर, गुटख्यावर कारवाई करताना भेसळयुक्त दुधावर देखील कारवाई व्हावी..निमगाव खलू प्रकल्पाला परवानगी नाहीउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथील प्रस्तावित सिमेंट निर्मिती प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याचे निवेदन माझ्याकडे आले आहे. त्या प्रकल्पाने नागरिकांच्या आरोग्याला धोका होणार असल्यास त्या प्रकल्पाला सरकार परवानगी देणार नाही. संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धारातील स्थानिक अडथळे निकाली काढा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.