Nandurbar News: खानदेशात वीजबिल थकबाकीमुळे ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना किंवा विहिरी, कूपनलिकांचे वीज संयोजन तोडण्याचा प्रकार २०२१, २०२२ मध्ये झाला होता. वीजबिल थकबाकीची समस्या कायम असून, वीजबिल भरण्यासाठी वित्त आयोगाच्या निधीचा उपयोग करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी कायम आहे. .२०२१, २२ मध्ये कोविडसंबंधीच्या अडचणी होत्या. ग्रामपंचायतींची वसुली थांबली होती. अजूनही वसुली व्यवस्थित नाही. यात वीज संयोजन तोडल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. ही वीज तोडणी मोहीम बंद करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. नंतर ही मोहीम थांबली. पण वीजबिल थकबाकी व ती भरण्यासंबंधीचा तोडगा यावर कार्यवाही झालेली नाही. .Electricity Bill Issue: वीज बिलातील वाढीव दरांविरोधात शिवसेनेचे संभाजीनगर मुख्य अभियंत्यांना निवेदन.पाणीपट्टी वसुलीत अडचणीजळगाव जिल्ह्यात ७५० आणि धुळ्यात सुमारे ४०० ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे वीज संयोजन कापण्यात आले होते. ते पूर्ववत झाले. यात अनेक मोठ्या व लहान ग्रामपंचायती आहेत. हे वीज संयोजन पूर्ववत करण्यासाठी वीजबिल थकबाकीमधील किमान ३५ टक्के रक्कम भरा, असे वीज वितरण कंपनीने म्हटले होते..Electricity Bill Dues : महावितरणची थकबाकी पोहोचली १५६ कोटींवर .पण एवढा निधीही ग्रामपंचायतींकडे नाही. यात अनेक ग्रामपंचायतींची थकबाकी २६ लाख ते एक कोटी रुपये आहे. यातील ३५ टक्के रक्कम भरणे शक्य नाही. कारण एवढी पाणीपट्टी वसुली करणे शक्य नाही, असे ग्रामपंचायतींकडून सांगण्यात येत आहे. .महसुलावर परिणामपिकांची हानी झाली आहे. यामुळे ग्रामस्थांकडे हवा तेवढा निधी नाही. तसेच हे वीजबिल भरण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य निधी देत नाहीत..यामुळे एवढ्या निधीची व्यवस्था वीजबिल भरण्यासाठी करणे शक्य नाही. दुसरीकडे गावात ग्रामस्थांसह पशुधनाला पाण्याची रोज आवश्यकता असते. यामुळे ग्रामपंचायतींच्या थकित वीजबिल प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी कायम आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.