Village Water Supply Issue: खानदेशातील एक हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसमोर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिल थकबाकीचा प्रश्न कायम आहे. काही महिन्यांपूर्वी वीज वितरण कंपनीने थकबाकीमुळे अनेक ग्रामपंचायतींची वीज जोडणी खंडित केली होती. त्यामुळे पाणीपुरवठा योजना, विहिरी आणि कूपनलिका बंद पडून ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता..जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींच्या समन्वयातून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तसेच वीजतोडणीविरोधात ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत ही मोहीम राबविण्यात आली होती..Electricity Bill Reduction: वीजदर उद्यापासून कमी होणार.जळगाव जिल्ह्यात सुमारे ७५० तर धुळे जिल्ह्यात सुमारे ४०० ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे वीज संयोजन खंडित करण्यात आले होते. सध्या वीजपुरवठा सुरू असला तरी थकबाकीची रक्कम वाढतच आहे..Electricity Bill Dues Issue: थकबाकीदार कार्यालयांवर महावितरणची कारवाई .ग्रामपंचायतींकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने वीजबिले भरणे कठीण होत असल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे. दुष्काळी परिस्थिती, कोविडकाळानंतरची आर्थिक अडचण आणि स्थानिक कर वसुलीतील मर्यादा यामुळे महसूल घटला आहे. त्यामुळे वीजबिल भरण्यासाठी आवश्यक निधी उभारणे शक्य होत नसल्याचे ग्रामपंचायतींकडून सांगितले जात आहे..वीज जोडणी पूर्ववत करण्यासाठी थकबाकीपैकी किमान ३५ टक्के रक्कम भरण्याची अट वीज वितरण कंपनीने घातली होती. मात्र अनेक ग्रामपंचायतींची थकबाकी २६ लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंत असल्याने ही अट पूर्ण करणे अवघड ठरत आहे..ग्रामस्थ आणि शेतकरी स्वतः आर्थिक अडचणीत असल्याने पाणीपट्टी व कर वसुली अपेक्षित प्रमाणात होत नाही. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा अन्य स्थानिक निधीतूनही तातडीची मदत उपलब्ध होत नसल्याची खंत ग्रामपंचायतींकडून व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.