Potato Prices Crash Farmers Face Distress: देशातील प्रमुख बाजारांमध्ये बटाट्याची आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल रस्त्याच्या कडेला टाकून देण्याची अथवा तो अत्यंत कमी भावात विक्री करण्याची वेळ आली आहे. विशेषतः पश्चिम बंगालसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाबमधील बाजारात बटाट्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. .उत्तर प्रदेशातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या आग्रा येथे बटाट्याचा घाऊक भाव प्रति क्विंटल ९०० ते १,२५० रुपयांवरून ते ५०० ते ६५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. पश्चिम बंगालमधील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोलकाता येथे भाव १,५०० रुपयांवरुन १,१०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. .मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भाव प्रतिक्विंटल ५०० ते १,४०० रुपयांवरून ३०० ते ९०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर दिल्लीतील बाजारात भाव ३०० ते ९०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. पंजाबच्या लुधियानात बटाट्याचा भाव १ हजार ते १,२०० रुपयांवरून ते ७०० रुपयांपर्यंत कमी झाला असल्याचे दिसून आले आहे..Potato Prices Crash: पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांना मोठा फटका, आंतरराज्य व्यापारातही घट.घाऊक दर घसरणीचा परिणाम किरकोळ बाजारावरही झाला आहे. बाजारात बटाट्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने गेल्या महिन्याभरात भाव कोसळले आहेत. त्यात गेल्या वर्षीचा साठा अजूनही शिल्लक आहे आणि त्यात नवीन आवकही होत असल्याने दरावर मोठा परिणाम झाला असल्याचे बटाटा व्यापारी सांगतात. .Potato Cultivation: पश्चिम बंगालमध्ये बटाटा पीक लागवडीखालील क्षेत्र घटणार?.पश्चिम बंगालसह मध्य प्रदेशातील कोल्ड स्टोरेजमधील साठा नोव्हेंबर अखेरपर्यंत खाली व्हायला हवा होता. पण अजूनही येथील कोल्ड स्टोरेजीसमध्ये लाखो बटाट्याची पोती पडून आहेत. सध्या बाजारात बटाटा प्रतिकिलो ५ ते ६ रुपये दराने विकला जात आहे. तर चिप्ससाठीचा चांगल्या दर्जाच्या बटाट्याचा दर ८ रुपयांपर्यंत खाली आला आहे. .बटाटा उत्पादन वाढीचा अंदाजपिकासाठी हवामान पोषक राहिले आहे. यामुळे यावर्षी उत्पादन सुमारे ५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) कडून व्यक्त करण्यात आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार २०२४-२५ मध्ये बटाट्याचे उत्पादन ५ कोटी ८१ लाख टन झाले होते. यावर्षी उत्पादन ६ कोटींहून अधिक टन होण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.