Pune News: शेतात घाम गाळून घेतलेली मेहनत, योग्य नियोजन आणि निसर्गाची साथ यासह बाजारात पिकाला चांगला दर मिळाला तरच शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. .खेड तालुक्यातील कमान येथील शेतकरी वर्षा नाईकरे, सुरेश नाईकरे व प्रकाश नाईकरे यांना अवघ्या एक एकर क्षेत्रावर घेतलेल्या बटाटा पिकाने समाधानकारक उत्पादन व चांगला आर्थिक लाभ मिळवून दाखवला आहे..Potato New Variety : बटाट्याच्या चार वाणाला मान्यता; बटाटा उत्पादन वाढीसह प्रक्रियेला फायदा.येथील नाईकरे परिवाराने एक एकर क्षेत्रावर तीन महिन्यांपूर्वी यांत्रिक पद्धतीने मशागत करून शेणखत पांगवून बटाटा पिकाची लागवड केली. वेळेवर खतांची मात्रा तसेच मर्यादित स्वरूपात कीटकनाशकांची फवारणी केल्याने पीक जोमदार आले. पीक परिपक्व झाल्यावर गुरुवारी (ता. २२) पिकाची काढणी करण्यात आली. पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत जवळपास ४० ते ४५ हजार रुपये खर्च आला. तर पिकापासून सुमारे १४० क्विंटल उत्पन्न मिळाले आहे..Potato Prices Crash: पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांना मोठा फटका, आंतरराज्य व्यापारातही घट.बाजारात काही दिवसांपासून बटाट्याला ८०० ते ९०० रुपये क्विंटल बाजारभाव असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र पिकाची चांगली गुणवत्ता व आकार पाहता बाजारात नाईकरे यांच्या बटाट्याला १२०० ते १३०० रुपये क्विंटल बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले..आम्ही साडेपाच क्विंटल बटाटा बियाणाची लागवड केली होती. स्वच्छ सूर्यप्रकाश तसेच रात्रीच्या थंडीमुळे पिकाची वाढ जोमदार झाली व रोगाची मात्रा न झाल्याने कीटकनाशकांवरचा खर्च वाचला. त्यामुळे अधिक लाभ मिळाला. वर्षा नाईकरे, सुरेश नाईकरे, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.