Ahilyanagar News: ‘‘निवडणुका अचानक रद्द करणे किंवा पुढे ढकलणे याचा गंभीर परिणाम जनतेवर होतो, याचा विचार निवडणूक आयोग करत नाही. पूर्वीचे आयोग स्वायत्त असायचे. निर्णयाचा अधिकार त्यांच्या हातात असायचा आणि सत्ताधारीही त्यांच्यापुढे सावध असत. .आता मात्र आयोग दबावाखाली काम करत असून त्याच्या कारभारात सत्ताधाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप लोकशाहीला घातक आहे,’’ असे मत माजी महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत दिलेल्या स्पष्ट निर्देशांकडे आयोग दुर्लक्ष कसे करू शकतो, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला..Election Commission : ‘पिपाणी’ चिन्ह वगळले.न्यायालयात दाखल याचिकांच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी आयोगाने नगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्याबाबत संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथे रविवारी (ता. ३०) पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी आयोग आणि सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून वेळेत आणि काटेकोरपणे निवडणुका घेणे अपेक्षित होते. निवडणूक आयोगात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे..Election Commission: मतदार यादीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय.प्रत्येकजण सूचना करेल आणि आयोग त्याप्रमाणे कार्यक्रम आखेल, तर ते धोकादायक आहे. नगराध्यक्षासारख्या नेतृत्वाच्या पदाची निवडणूकही पुढे ढकलल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माझ्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात असा गोंधळलेला निवडणूक आयोग कधीही पाहिला नाही..आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम चुकीचा, विस्कळीत आणि संशयास्पद असल्याचे सांगून थोरात म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत दिलेल्या स्पष्ट निर्देशांकडे आयोगाने दुर्लक्ष केले आहे. निवडणूक अचानक रद्द करणे किंवा पुढे ढकलणे याचा गंभीर परिणाम जनतेवर होतो, याचा विचार आयोग करत नाही. या सगळ्या गोंधळाची जबाबदारी कोणाची, आयोगाच्या चुका जनतेच्या माथी मारणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे जबाबदारांना शिक्षा होणे आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.