Palghar News: दीर्घकाळ चाललेल्या पावसानंतर ग्रामीण भाग पुन्हा शेतीकामांच्या जोशात रंगू लागला आहे. सध्या तालुक्यात सर्वत्र भातकापणीची लगबग सुरू असून अनेक शेतकरी कापणीसोबतच तातडीने झोडणीचे कामही उरकू लागले आहेत. .थंडीच्या लाटेत शेतकऱ्यांनी दिवसेंदिवस गती पकडल्याने भातकापणीचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. या वर्षी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. ऐन कापणीवेळी पावसामुळे काही ठिकाणी भात आडवे झाल्याने उत्पादनात घटले आहे..Paddy Harvest: चंदगड तालुक्यात पावसाच्या धास्तीने भात कापणी वेगात.हळव्या वाणांना अधिक फटका बसला आहे. हळवे वाण पूर्णपणे ओलाव्याला संवेदनशील असल्याने उत्पादन घटले आहे. अनेक ठिकाणी भाताचे कणीस काळपटले. जमिनीवर आडवे झाल्यामुळे धान्याचा ओलावा वाढला, मात्र प्रतिकूल परिस्थिती असूनही उरले-सुरले भात लवकर कापून झोडून घरी आणण्याचा शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे..Paddy Harvesting: भात कापणी करताना शेतकरी मेटाकुटीला.मजुरांचे संकटएकाचवेळी सर्वत्र कापणी व झोडणी सुरू झाल्याने तालुक्यात मजूर तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. मजुरीतही लक्षणीय वाढ झाली असून उपलब्ध मजूर अनेकदा गटाने काम करणे पसंत करतात..कापणीची वेळ चुकली तर मोठे नुकसान होते, त्यामुळे उपलब्ध मजुरांनाच वाढीव मजुरी देऊन काम करावे लागत आहे, असे स्थानिक शेतकरी सांगतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.