डॉ. विवेक संगेकर, डॉ. रवींद्र जाधवगाईंमध्ये प्रसूतीनंतरचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रसूतीनंतरच्या १० ते १५ दिवसांमध्ये गाईच्या शरीरातील विविध प्रक्रियांमध्ये अनेक आमूलाग्र बदल घडतात. प्रसूतीनंतरच्या काळात गाईंच्या शरीरावर ताण येऊन त्या अशक्त होतात, प्रतिकारशक्ती कमी होते. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो. गाईंच्या शरीरावर या ताणाचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे चयापचय आजार होतात. गाईंमध्ये प्रसूतीनंतरचा ताण कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रसूतीनंतर सतत उद्भविणाऱ्या ताणाचा परिणाम दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमतेवर होतो. .शारीरिक ताण प्रवृत्त करणारे घटकदुधाळ गाईंची जास्त दुग्ध उत्पादकता.तुलनेने जास्त उत्पादकता असलेल्या संकरित गाई.उष्ण आणि दमट वातावरणात अचानक होणारे बदल.गोठ्यामध्ये जनावरांची गर्दी होऊन स्वछंदी वावरास अडथळा.प्रसूतिपूर्व किंवा प्रसूतीनंतर लगेच होणारी लांब पल्ल्याची वाहतूक.प्रसूतीनंतर व्यायलेल्या गाईचे कळपातून होणार विलगीकरण..Animal Care: ऊस वाढ्याचा जनावरांवर परिणाम.ताण निर्माण होण्याची कारणेअवघड प्रसूती आणि प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव.प्रसूतीनंतर वार वेळेवर न पडणे.आहारात ऊर्जा व प्रथिनांची कमतरता.प्रसूतीनंतरचे हार्मोनल बदलगर्भाशयाचा संसर्ग..आहारातील चयापचय संबंधित समस्याआहारामध्ये जीवनसत्त्वाचा (जीवनसत्त्व ई आणि सी) अभाव.- प्रसूतीनंतर शरीरातील ऊर्जा उणे (ऋणात्मक/कमी) स्थितीत जाणे.- आहारामध्ये मुख्यत्वे कॅल्शिअम, स्फुरद, मॅग्नेशिअम, जस्त आणि सेलेनियम अभाव..ताण निर्माण झाल्याची लक्षणे- भूक मंदावणे, रवंथ प्रक्रिया कमी होते.- पाणी कमी पितात, सुस्तपणा येतो.- दूध उत्पादन घटते, नाकातून स्त्राव येतो.- श्वास घेण्यास त्रास होतो, तोंडावाटे श्वास घेतात.- शरीराचे तापमान तुलनेने कमी होते. खुराक खात नाहीत..अशा स्थितीत नवीन व्यायलेल्या गाईला कॅल्शिअम कमतरतेमुळे दुग्धज्वर (मिल्क फीव्हर), स्फुरद कमतरतेमुळे लाल मूत्र आजार (प्रसूतिपश्चात हिमोग्लोबिन युरिया), आहारातील ऊर्जा कमतरतेमुळे किटोसिस यांसारख्या चयापचयाचे आजार होतात. शरीरातील ऊर्जा कमी झाल्याने शरीरप्रक्रिया आणि दुग्ध उत्पादन निरंतर ठेवण्यासाठी शरीरातील चरबीचे यकृतामार्फत विघटन होऊन ऊर्जा निर्मिती होत असताना यकृतामध्ये चरबी साचून फॅटी लिव्हर आजार होण्याचा धोका असतो..Animal Care : दुधाळ जनावरांमधील सुप्त कॅल्शिअम कमतरता .निदानआहारामध्ये ऊर्जा आणि प्रथिनांचा अभाव.आहारामध्ये जीवनसत्त्वाचा (जीवनसत्त्व ई आणि सी) अभाव. आहारामध्ये कॅल्शिअम, स्फुरद, मॅग्नेशिअम, जस्त आणि सेलेनियम खनिजांचा अभाव. अवघड प्रसूती आणि प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव. रक्त तपासणीद्वारे संक्रमित जीवजंतूचे निदान. यकृत चाचणीद्वारे चरबीयुक्त यकृत, कावीळ आणि प्रथिनांच्या कमतरतेचे निदान. रक्तातील ग्लुकोजची चाचणी. रक्तातील कॅल्शिअम, स्फुरद, मॅग्नेशिअम, जस्त आणि सेलेनियम यासारख्या खनिजांची चाचणी. सोनोग्राफीद्वारे गर्भाशय संबंधित आजाराचे निदान. क्ष किरण तपासणीतून फुफ्फुस आणि जठरासंबंधीत विकारांचे निदान..उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय अवघड प्रसूती आणि प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेल्या गाईचे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्वरित उपचार करावेत. प्रसूतीनंतर वार वेळेत न पडल्यास पशुवैद्यकास कळवावे. गाईच्या आहारामध्ये ऊर्जा आणि प्रथिनेयुक्त आहाराचा समावेश करावा. गाईला चाऱ्याबरोबर नियमित खनिजक्षार मिश्रण द्यावे. जेणेकरून खनिज कमतरतेमुळे होणारे चयापचय विकार टाळता येतील. गाईच्या खाद्यामध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आवश्यक जीवनसत्त्वांचा समावेश करावा. उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी गाईंना सावलीत बांधावे, यामुळे उष्माघात होणार नाही. गोठ्यामध्ये जनावरांना नियमित हालचाली विनासायास करता याव्यात एवढी पुरेशी जागा असावी आणि गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. हिवाळ्याच्या दिवसात गाईचे थंडीपासून संरक्षण करावे जेणेकरून त्यांच्या शरीरातील तापमान कमी होऊन त्या चयापचय विकारांना बळी पडणार नाहीत. प्रसूतीनंतर आहारामध्ये अचानक होणारा बदल टाळावा. गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात किंवा व्यायल्यानंतर सुरवातीच्या काळात गाईंची लांब पल्ल्याची वाहतूक टाळावी.- डॉ. विवेक संगेकर, ९०७५८८९४९०(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.