Wardha News: पवनार ते पाचोरा असा प्रस्तावित ८०३ किलोमीटरचा ‘शक्तिपीठ महामार्ग’ आता आणखी लांबण्याची शक्यता आहे. विविध जिल्ह्यांतून स्थानिक व तांत्रिक अडचणी, तसेच शेतकरी व नागरिकांच्या विरोधामुळे या महामार्गाच्या काही टप्प्यांतील सरळ मार्ग (किरकोळ) बदलण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. परिणामी महामार्गाची एकूण लांबी सुमारे ८५५ किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे..कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यांत महामार्गाला तीव्र विरोध झाला आहे. विशेषतः सुपीक शेती, बागायती क्षेत्र, वसाहती आणि धार्मिक स्थळे बाधित होत असल्याच्या तक्रारी शेतकरी व ग्रामस्थांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) मार्गातील बदलांचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत..Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’ला विरोध कायम.एमएसआरडीसीने सुधारित सरळरेषा (अलाइन्मेंट) तयार करण्याचे काम सुरू केले असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ४८० किलोमीटरचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान काही ठिकाणी तांत्रिक अडचणी व स्थानिक विरोध लक्षात आल्याने पुढील बदल आवश्यक ठरणार आहेत..Shaktipeeth Expressway: 'शक्तिपीठ'चा मार्ग बदलला, सोलापूर, सांगली, चंदगड...मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली सविस्तर माहिती.३७५ गावांमधून जाणार महामार्गसुरुवातीला १२ जिल्ह्यांतील ३७० गावांमधून जाणारा शक्तिपीठ महामार्ग आता सुमारे ३७५ गावांमधून जाणार असल्याचे संकेत आहेत. या महामार्गामुळे ४८ धार्मिक स्थळांना जोडणी मिळणार असून, कोल्हापूर, करवीर आणि तीन शक्तिपीठांचा समावेश असलेल्या परिसरातून हा मार्ग जाणार आहे. पंढरपूर, औंढा नागनाथ, परभणी, नांदेड आदी धार्मिक स्थळांनाही या महामार्गामुळे जोड मिळणार आहे..शेतकऱ्यांच्या नजरा सरकारकडेसुधारित प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता आहे. मात्र, शेतीजमीन, बागायती क्षेत्र आणि उपजीविकेवर होणाऱ्या परिणामाबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही साशंकता आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या आक्षेपांचा कितपत विचार करते, याकडे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.