Pune News: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांत आणखी चांगले दर मिळण्याची शक्यता तयार झाली आहे. उपपदार्थांच्या दरातील तेजी व उन्हाळ्यातील वाढती मागणी हे दोन्ही मुद्दे दूध दरवाढीस पोषक ठरतील, असा अंदाज डेअरी उद्योगातून वर्तविला जात आहे..सध्या शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रति लिटर ३७ रुपये व त्यापुढे दर मिळत आहेत. यापुढेही खरेदी दर कमी होणार नाहीत, असे डेअरीचालकांचे म्हणणे आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, लोणी (बटर) व दूध भुकटीमधील (मिल्क पावडर) तेजी टिकून आहे. ही स्थिती दूध खरेदीदराच्या वाढीला कारणीभूत ठरत असते. सध्या दूध भुकटीचा दर प्रतिकिलो २० रुपयांनी वाढून तो २६० रुपयांपर्यंत गेला आहे..तसेच दूध प्रकल्पांमधील (डेअरी) लोण्याचे दर प्रति किलो ३० रुपयांनी वाढून ४७० वरून ५०० रुपयांच्या पुढे गेलेले आहे. लोणी, दूध भुकटीचे दर भविष्यात टिकून राहिल्यास व उन्हाळ्यातील कृष काळात घटणारे दूध संकलन बघता दूध उत्पादकांना पोषक स्थिती तयार होईळ. कारण, दर्जेदार दुधासाठी शेतकऱ्यांना दुधाचे खरेदीदर वाढवून देण्यास दूध प्रकल्पांना अनुकूल स्थिती तयार होऊ शकते..Clean Milk Production: स्वच्छ दूध उत्पादनावर प्रात्यक्षिक .थंडी कमी होताच ताक, लस्सी, आइस्क्रीमला मागणी वाढेल व उन्हाळ्याच्या तोंडावर ही मागणी झपाट्याने विस्तारेल. त्यामुळे उपपदार्थांच्या बाजारात तेजी राहील. ही तेजी शेतकऱ्यांकडून चांगल्या दराने दूध विकत घेण्यास डेअरी उद्योगाला उपयुक्त ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या शेतकऱ्यांच्या दुधाला काही भागात प्रतिलिटर ३९ रुपयांपेक्षा जादा दर दिले जात आहेत..‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले म्हणाले, की सध्याची स्थिती दूध उत्पादकांसाठी समाधानकारक आहे. परंतु तेजीचे खरे चित्र एप्रिलमध्ये निश्चित होईल. कारण उत्तर भारतात दुधाचे खरेदी दर काही दिवसांपूर्वी कमी झाले होते व आता त्यात परत वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला ‘अमूल’ने राज्यात काही भागात खरेदी दर एक रुपयाने कमी केला आहे. तर दुसरीकडे ‘हटसन’ डेअरीने खरेदीत एक रुपया व ‘सोनाई’ने एक रुपया टॅंकर दरासाठी वाढविला आहे. दुधाचे दर टिकून राहण्याचे कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात थंडीमुळे दूध उत्पादन वाढलेले नाही..Milk Price: दूध खरेदी दर वाढेना!.उपपदार्थांबाबत श्री. गोडबोले म्हणाले, की मध्यंतरी लोण्याचे दर दहा-वीस रुपयांनी उतरले होते व ते पुन्हा आता प्रति किलो ५२० रुपयांपर्यंत झाले आहेत. गाय दुधाच्या भुकटीचे दर २४०-२६० रुपये, तर म्हैस दुधाच्या भुकटीचे ३०० ते ३२० रुपये असून दोघांचीही मागणी वाढते आहे. लोण्याचा तुटवडा कायम असून त्याला मागणी टिकून आहे. परंतु अद्यापही बाहेरच्या राज्यांतील स्थिती व आपल्याकडील स्थिती भिन्न आहे. दुधाची आगामी पुरवठा स्थिती, लोणी व भुकटीची तेजी-मंदी व उपपदार्थांची मागणी याविषयीचे चित्र आणखी स्पष्ट झाल्यानंतर एप्रिलनंतर दुधाच्या तेजीची स्थिती सांगता येईल..उप पदार्थ - दर (रुपयांत)लोणी - ५२०गाय दुधाची भुकटी - २४०-२६०म्हैस दुधाची भुकटी - ३००-३२०.डेअरी उद्योगातील सध्याच्या घडामोडी राज्यातील दूध उत्पादकांसाठी फलदायक ठरतील, असे वाटते. कारण उपपदार्थांचे भाव तेजीत असून ते टिकून आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर दुधाचा पुरवठा कमी पडतो. त्यामुळे डेअरी उद्योगातून दूध खरेदीचे दर वाढविण्यासाठी अनुकूल निर्णय घेतले जाऊ शकतात. अर्थात, ही वाढ नेमकी कधी व किती असेल, याबाबत निश्चित अंदाज वर्तविता येणार नाही.प्रकाश कुतवळ, सचिव, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ..राज्यात शेतकऱ्यांना सध्या दुधाचे दर बऱ्यापैकी मिळत आहेत. मात्र, तरीही ते उत्पादन खर्चाइतके नाहीत. उत्पादन खर्च वाढलेला असताना प्रतिकूल हवामानामुळे उत्पादकता मात्र घटलेली आहे. त्यामुळे दुधाचा रास्त उत्पादन खर्च काढून त्याआधारे किफायतशीर दर ठरविणारी पद्धत विकसित करणे आणि उत्पादन खर्च कमी करणे, अशा दोन्ही मुद्द्यांसाठी धोरणात्मक पावले टाकण्याची गरज आहे.डॉ. अजित नवले, समन्वयक, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघर्ष समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.