डॉ. व्यंकटराव घोरपडेPortable Ultrasound Technology : पशुसंवर्धन विभागाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे पशू प्रजनन आणि आनुवंशिक सुधारणा. राज्यामध्ये पशू पैदास सुधार कार्यक्रमांतर्गत एकूण सहा भृणप्रत्यारोपण प्रयोगशाळा उभ्या राहत आहेत. राष्ट्रीय गोकूळ मिशन या केंद्रशासनाच्या योजनेअंतर्गत शेळी- मेंढी पालन या योजनेसाठी ४००+२० ते १००+५ अशा शेळ्या मेंढ्यांच्या गट संख्येसाठी अनुक्रमे १ कोटी ते २० लाख प्रकल्प मूल्याच्या योजना ५० टक्के अनुदानावर महाराष्ट्रात राबविली जात आहे..त्यासाठी राज्यातील अनेक पशुपालक अर्ज करत आहेत. राज्यात विविध पशुवैद्यकीय दवाखान्यात दैनंदिन हजारो गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या या गर्भ व वंध्यत्व तपासणीसाठी नियमित येत असतात. यासाठीच पशुवैद्यकीय दवाखान्याच्या स्तरावर विभागाने वेगवेगळ्या योजना व आर्थिक तरतुदीतून एकूण तीनशेपेक्षा अधिक पोर्टेबल अल्ट्रासाउंड मशिन पुरवण्यात आल्या आहेत..पोर्टेबल अल्ट्रासाउंड मशिनचा उपयोगपशुवैद्यक क्षेत्रात पोर्टेबल अल्ट्रासाउंड मशिनचा वापर हा मुख्यत्वे करून गर्भधारणा तपासणी व संबंधित गर्भाशय, स्त्रीबीजांड यांच्या तपासणी करता केला जातो. अनेक विद्यापीठात संशोधनासाठी देखील याचा वापर होतो. काही वेळा तज्ञ पशुवैद्यक त्याचा वापर करून अचूक निदान, औषधोपचार आणि मार्गदर्शन देखील करू शकतात..Animal Husbandry: प्रतिजैविक प्रतिकारकता रोखणे काळाची गरज.याच्या नियमित वापराने पशुपालकांना दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी, वराह पालन अधिक फायदेशीरपणे करता येतो. याचा वापर केल्यामुळे आपण एकूण गर्भधारणेचे प्रमाण वाढवू शकतो. दोन वेतातील अंतर कमी करू शकतो. योग्य त्या मर्यादेत आपण हार्मोनचा वापर देखील करू शकतो. त्याद्वारे भाकड काळातील व्यवस्थापनाचा खर्च कमी करून मोठ्या प्रमाणात पशुपालकांची बचत होऊ शकते..या मशिनमुळे आपल्याला जनावराच्या पुनरुत्पादन संबंधित आरोग्य व व्यवस्थापन काटेकोरपणे हातळण्यासाठी मदत होते. पशुव्यवस्थापनामध्ये आपण ‘वर्षाला एक वासरू’ मिळायला हवे असे म्हणतो. त्यासाठी या मशिनचा वापर वाढला पाहिजे. या मशिनद्वारे २६ ते ३० दिवसांची गर्भधारणा तपासता येते.वंध्यत्व तपासणी देखील वेळेत होऊन उपचाराने गर्भधारणा होण्यासाठी मदत होते. सोबत गर्भाशय संबंधित अनेक व्याधी, विकृती जशा माजावर न येणे, जास्त दिवस गर्भधारणा राहिल्याने होणारे वासराचे मम्मीफिकेशन, गर्भाशय दाह याचे निदान देखील वेळेत आणि अचूक होत असल्यामुळे या सर्व विकृती व्याधी वर मात करता येते. त्यातून पशुपालकाचे होणारे नुकसान टाळता येते..राज्यात भ्रूणपत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यास सुरुवात झाली आहे. त्या माध्यमातून जादा दूध देणाऱ्या कालवडी, रेड्या या पशुपालकांच्या गोठ्यात निर्माण होणार आहेत. राज्यातील देशी गोवंशाचे दूध उत्पादन हे अत्यल्प आहे. त्यामध्ये देखील वाढ होणे अपेक्षित आहे. त्यासाठी या मशिनचा वापर वाढणार आहे. किंबहुना या मशिनच्या वापराशिवाय या बाबी शक्य नाहीत..Agriculture Technology: शाश्वत शेतीसाठी थर्मल सेन्सर्स.पशुपालकाकडे असलेल्या उच्च व आनुवंशिकतेच्या गाई म्हशी पासून भ्रूण तयार करण्यासाठी या मशिनचा वापर अनिवार्य आहे. त्यामुळे भ्रूण प्रत्यारोपित गर्भधारणेची टक्केवारी मोठ्या प्रमाणामध्ये सुधारू शकते. एकाच वेळी सर्व जनावरे माजावर आणण्यासाठी (माजाचे नियमन) हार्मोनचा वापर करतात. तो वापर स्त्रीबीजांडाची स्थिती तपासून केल्यास कमी कालावधीत व कमी खर्चात गर्भधारणेची टक्केवारी आपण वाढवू शकतो..या सर्व बाबी पोर्टेबल अल्ट्रा सोनोग्राफी मशिनचा वापर पशुपालकाच्या गोठ्यात, प्रक्षेत्रावर, शेळ्या, मेंढ्या, वराह यांच्या शेडवर करता आला तरच शक्य आहे. पण केंद्र शासनाच्या प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान कायदा (पीसी अँड पीएनडीटी) १९९४ मुळे आजच्या घडीस हे मशिन निर्धारित केलेल्या कार्यक्षेत्राबाहेर घेऊन जाण्यासाठी व वापरण्यासाठी प्रतिबंधित केले आहे. कारण राज्याच्या काही भागात प्रसूतिपूर्व गर्भनिर्धारण व लिंग निदानासाठी या यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळे हा कायदा करण्यात आला. तो योग्य देखील आहे आणि याबाबत कोणाचेही दुमत नाही..परंतु त्यामध्ये पशुवैद्यकांना पोर्टेबल अल्ट्रा सोनोग्राफी मशिन वापरताना त्याची आवश्यकता, त्यातून होणारे फायदे हे दुर्लक्षित केले आहेत. त्याचा वापर हा मर्यादित दवाखान्याच्या आवारातच करण्याबाबत निर्बंध आहेत. त्यामुळे ते कार्यक्षेत्राबाहेर प्रत्यक्ष पशुपालकाच्या गोठ्यात, शेळ्या, मेंढ्या, वराह यांच्या शेडवर देखील घेऊन जाता येत नाही.त्यामुळे पशुपालकांचा एक फार मोठा समूह त्याच्या फायद्यापासून वंचित राहतो. अनेक वेळा गरजू पशुधन दवाखान्यात आणता येत नाही. शेळ्या, मेंढ्या, वराह यांना मोठ्या संख्येने दवाखान्यात आणावे लागते. त्यामुळे खर्च व मानसिक त्रास सोसावा लागतो..कायदेशीर वापराची गरजभ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळांना मात्र केंद्रीय सचिव यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रानुसार काही अटी व शर्तीवर बाहेर वापरायला परवानगी दिली आहे. त्यामध्ये मशिन किंवा बाह्य स्वरूपात जीपीएस प्रणाली वापरून त्याचा वापर करावा.त्याची हालचाल नोंदवही ठेवावी. तपासणी केलेल्या जनावरांची विविध नमुन्यातील माहिती ही संबंधित जिल्हा आरोग्य यंत्रणेला सादर करावी. फक्त आणि फक्त भ्रूण प्रत्यारोपण करून (एबीआयपी) पशुपैदास सुधारणा कार्यक्रमासाठी हे यंत्र बाहेर घेऊन जावे. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रयोगशाळा प्रमुखाची आहे. .त्यामुळे या प्रयोगशाळेशी संबंधित अधिकारी याचा वापर बाहेर करत आहेत. कमीत कमी त्याच धर्तीवर सदर १९९४ च्या प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान (पीसी अँड पीएनडीटी) कायद्यात कुठेही पशुवैद्यकीय क्षेत्राच्या वापराबाबत उल्लेख नाही, त्यामध्ये या पद्धतीने जर बदल केले आणि परवानगी दिली तर मात्र वर उल्लेख केलेल्या बाबीसाठी याचा वापर करता येईल. पशुवैद्यकीय क्षेत्रासाठी स्वतंत्र कायदा आणि सोनोग्राफी युनिट नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आवश्यक आहे. यामुळेच सध्याच्या बंदीमुळे जे अनेक अडथळे निर्माण झाले आहेत ते दूर होऊन पशुपालक त्याचा लाभ घेऊ शकतील.- डॉ.व्यंकटराव घोरपडे ९४२२०४२१९५(सेवानिवृत्त साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.