Infrastructure Issues: देशभरात आधुनिक महामार्गाची उभारणी वेगाने होत असताना घाटंजी तालुक्यातील ग्रामीण भाग अद्याप खराब रस्त्यांच्या छायेतच आहे. कोची, आंबेझरी यांसारख्या भागांसह अनेक गावांतील नागरिकांना दररोज खडतर रस्त्यांवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो..घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा, घोटी, दडपापूर तांडा, जरंग, जरूर, मोवाडा, मानोली, पाटापांगरा, तळणी, उंदरणी तसेच कोची व आंबेझरी यांसह अनेक खेड्यांतील अंतर्गत रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खड्ड्यांनी व्यापले असून, पावसाळ्यात चिखलामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनते..Rural Roads Issues: शेतकरी-ग्रामस्थांचा दळणवळणाचा मार्ग खडतर.नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. रस्त्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघातही वाढले आहेत. विशेष म्हणजे, काही रस्ते नुकतेच बांधण्यात आले असतानाही अल्पावधीतच त्यांची अवस्था बिकट झाली. करणवाडी ते जरूर मार्गावर वर्षभरातच खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अशीच अवस्था इतर नवीन रस्त्यांची आहे. काही रस्त्यांची एवढ्या वेळा डागडुजी झाली की संपूर्ण रस्ता ठिगळांनी व्यापलेला आहे..PMGSY Road Issue: सहा महिन्यांत ४६ कोटींचा रस्ता उखडला.ग्रामीण भागातील जनतेला खराब रस्त्यांमुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. मोठ्या रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे.-आकाश राठोड, जिल्हाप्रमुख, युवासेना (शिंदे), यवतमाळ.ग्रामीण भागातील जनता अजूनही खडतर रस्त्यांवरून प्रवास करते. हे चित्र कधी बदलणार? मंत्री, खासदार, आमदार व अधिकाऱ्यांनी ग्रामीण रस्ते एकदा पाहावे.-मोरेश्वर वातिले, सामाजिक कार्यकर्ते, जरूर.चांगले रस्ते असल्याशिवाय या भागात राहणाऱ्यांचे जीवनमान सुसह्य होऊच शकत नाही. एकीकडे भव्यदिव्य रस्ते तर दुसरीकडे रस्त्यांवर खड्डेच खड्डे हे चित्र बदलावे लागेल.-सहदेव राठोड, माजी पंचायत समिती सदस्य, भांबोरा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.