Agriculture Market Yard: पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वादग्रस्त ठरलेला डाळिंब यार्ड उभारणीचा प्रस्ताव पुन्हा पुढे सरकत असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू झाली आहे. यापूर्वी पणन संचालकांनी फेटाळलेला यासंदर्भातील प्रस्ताव पुन्हा राबविण्यासाठी आर्थिक देवाणघेवाणीच्या बैठका झाल्याची चर्चा असून, त्यामुळे बाजार समितीतील वातावरण तापले आहे..बाजार समितीतील काही संचालक आर्थिक हितसंबंधांतून रिकाम्या जागांचे वाटप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. डाळिंब यार्ड परिसरातील चार आडत्यांच्या शेडवरील वाढीव जागा ताब्यात घेण्याची अर्धवट कारवाई केल्यानंतर आता त्याच परिसरात १४ व्यापाऱ्यांना जागा देण्याचा घाट घातला जात असल्याचे बोलले जात आहे. या जागांसाठी प्रत्येकी १० ते १५ लाख रुपयांच्या व्यवहारांची चर्चा बाजार आवारात रंगली आहे..Pune APMC: पुणे बाजार समितीच्या उत्पन्नात सहा कोटींची घट.दरम्यान, बाजार आवारातील अडते संघटनांनी प्रस्तावित डाळिंब यार्डाला तीव्र विरोध दर्शविला आहे. फळे व भाज्यांचा व्यापार हळूहळू बाजार आवाराबाहेर जात असल्याने बाजार समितीच्या उलाढालीवर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बाजारातील सर्व व्यवहार मुख्य आवारातच व्हावेत, अशी मागणी संघटनांनी केली आहे. काही वर्षांपूर्वी डाळिंब व्यापार वाढत असल्याने बाजार समितीने गेट क्रमांक ४ लगत सुमारे एक एकर जागेत डाळिंब यार्ड उभारले होते. त्या वेळी चार अडत्यांना जागा देण्यात आली होती..सुरुवातीला तेथे व्यापार सुरळीत सुरू होता आणि मोठ्या प्रमाणात डाळिंबाची आवक होत होती. त्यानंतर इतर व्यापाऱ्यांनीही जागेची मागणी सुरू केली. मात्र प्रस्तावित नवीन डाळिंब यार्डासाठी निवडलेली जागा न्यायालयीन वादात असल्याने हा प्रस्ताव अडचणीत आला होता. तरीही बाजार समिती प्रशासनाने जागावाटपाचे नियोजन करून नकाशादेखील तयार केल्याचे सांगितले जाते. यापूर्वी तीन ते चार वेळा जागावाटपाचे प्रयत्न झाले; मात्र ते प्रत्येकवेळी फिस्कटले..Pune APMC: पुणे बाजार समितीत अतिक्रमणांवर थातुरमातूर कारवाई.पणन संचालकांनी यापूर्वी दिली होती स्थगितीबांबू मार्केट परिसरातील जागा डाळिंब व्यापाऱ्यांना भाडेकराराने देण्याचा निर्णयही यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र तत्कालीन पणन संचालक विनायक कोकरे यांनी या निर्णयाला स्थगिती देत डाळिंब यार्डाबाबत कोणतीही पुढील कार्यवाही करू नये, असे आदेश दिले होते..‘‘बाजार आवारातील व्यापार बाहेर जात आहे. टप्प्याटप्प्याने बोरे, लिंबू, तरकारी आणि पालेभाज्यांचा व्यापार बाजाराबाहेर गेला आहे. बाजारातील सर्व व्यापार गाळ्यावरच व्हावा. त्यामुळे सर्व आडतदारांना समान न्याय मिळेल.’’- अमोल घुले, अध्यक्ष, श्री शरद गजानन अडते असोसिएशन.‘‘स्वतःचे गाळे भाड्याने देऊन शेतमालासाठी अतिरिक्त जागेची मागणी करणे चुकीचे आहे. ठरावीक वाणाला जागा देऊन मक्तेदारी तयार होते. त्यामुळे ठरावीक व्यापाऱ्यांना जागा न देता सर्वांसाठी खुला हॉल असावा.’’- सौरभ कुंजीर, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज अडते असोसिएशन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.