Pomegranate Theft Issue: डाळिंब बागेत चोरी; सहा लाखांचे नुकसान
Farmer Loss: आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या बागेतील फळांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी शेतातील सुमारे १२५ क्रेट डाळिंब फळांची चोरी केल्याने शेतकरी बाळू बबन लोखंडे यांचे अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.