Chandrapur News : मागील काही दिवसांपासून संततधार तर कधी मूसळधार पावसाने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. अतिपावसाच्या तडाख्यात शेतात डोलणारी पिके आता धोक्यात आली आहेत. नदी, नाले आणि पुलांच्या काठांवरील पिकांची अवस्था डोळ्यात पाणी आणणारी आहे. त्या पार्श्वभूमीवर पोंभूर्णा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे..यंदाच्या हंगामात पावसाने उशिराने हजेरी लावली. आधीच मेटाकुटीस आलेल्या आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही कमालीचा वाढला. कालांतराने सोयाबीन पीक समाधानकारक डोलू लागले, मोजक्या काही शेतकऱ्यांकडील कपाशीचेही चित्र बऱ्यापैकी होते. .Rain Crop Damage : जुलै मधील अतिवृष्टीमुळे ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान.अशातच सुमारे आठवड्यापासून कधी संततधार तर कधी मुसळधार पावसाने पिके उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला. अतिपाऊस झाल्याने सोयाबीनवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. सोयाबीनचे दाणे भरणार की नाही, यावर शंका व्यक्त होत आहे. मागील वर्षीही बारीक दाण्याने शेतकऱ्यांचा घात केला होता. .Soybean Crop Damage : सोयाबीनच्या शेंगा झाडावरच वाळू लागल्या.उत्पादनात कमालीची घट बघावयास मिळाली होती. काही शेतकरी वगळता बहुतांश कपाशी उत्पादकांच्या शेतातील पिकांची वाढ खुंटलेलीच दिसून आली. झाडे पिवळी पडायला लागली. अतिपावसामुळे अनेकांच्या शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचले. यामुळे चिखलाचेही साम्राज्य शेतात पसरले असून, चिखलानेच माखलेले पीक मातीमोल होण्याची भीती व्यक्त होत आहे..आता कृषी विभागाने शिवारात जाऊन सर्वेक्षण करण्याची गरज आहे. सोयाबीन, कपाशी या दोन पिकांना मोठा फटका बसला असून, भात पीकही संकटात अडकले आहे. अधिकचा उत्पादन खर्च शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत अडकवणारा ठरला आहे.- प्रफुल लांडे, शेतकरी, चेक आंबेधानोरा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.