डॉ. भरत टेमकरPolythene Mulching for vegetables: उच्च प्रतीच्या टोमॅटोला शहरांमध्ये व निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. मात्र पाण्याची टंचाई, तणांची वाढ आणि वाढता मजुरी खर्च यामुळे उत्पादन खर्च वाढतो. या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे पॉलीथीन आच्छादन (मल्चिंग पेपर). योग्य पद्धतीने वापर केल्यास उत्पादन वाढते, फळांची गुणवत्ता सुधारते आणि किड‑रोगांचा धोका कमी होतो..पॉलीथीन आच्छादनाचे फायदेपॉलीथीन आच्छादनामुळे तणांचे नियंत्रण होते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, खतांचा ऱ्हास थांबतो आणि मजुरीचा खर्च घटतो. जमिनीचे तापमान संतुलित राहते, उपयुक्त जिवाणूंची वाढ होते, फळे स्वच्छ व आकर्षक मिळतात आणि किड‑रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे उत्पादन लवकर येते व बाजारभाव चांगला मिळतो..Tomato Cultivation: उन्हाळ्यात टोमॅटो लागवड कशी करावी? शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन.पॉलीथीन मल्चिंगचे तोटेया पद्धतीत सुरुवातीचा खर्च जास्त येतो. काढणी व आंतरमशागत करताना काळजी घ्यावी लागते. दोन बेडमधील मोकळ्या जमिनीची धूप होऊ शकते आणि उंदीर‑घुशी कागद कुरतडू शकतात. त्यामुळे योग्य देखभाल आवश्यक असते.मल्चिंग पेपरची निवडटोमॅटोसाठी १ मीटर रुंदीचा, चंदेरी रंगाचा आणि २५ ते ३० मायक्रॉन जाडीचा पेपर योग्य ठरतो. साधारण ४०० मीटर लांबीचे रोल उपलब्ध असतात. एकरी सुमारे ५ ते ६ बंडल लागतात..जमिनीची तयारीमाती परीक्षण करून सामू ६ ते ७ दरम्यान ठेवावा. नांगरट करून माती भुसभुशीत करावी. तीन फूट रुंदीचे गादीवाफे तयार करावेत. लागवडीपूर्वी शेणखत, सेंद्रिय खते व आवश्यक रासायनिक खते मिसळावीत. ठिबक सिंचनाची व्यवस्था आधी करणे फायदेशीर ठरते..बेडवर मल्चिंग कागद अंथरण्याची पद्धतप्रथम गादीवाफ्यावर ठिबकची लॅटरल टाकावी. त्यावर मल्चिंग पेपर पसरवून दोन्ही बाजू मातीखाली दाबाव्यात. त्यानंतर दोन ते अडीच फूट अंतरावर सुमारे ८ ते १० सेंमी व्यासाची छिद्रे पाडून त्यामध्ये ट्रेमधील रोपे लावावीत.खर्च व आर्थिक फायदाएकरी मल्चिंग पेपरसाठी अंदाजे १२,००० ते १३,००० रुपये खर्च येतो. मात्र तणनियंत्रण, पाणी‑खत बचत, कमी किड‑रोग आणि दर्जेदार उत्पादनामुळे हा खर्च सहज भरून निघतो. प्रतिकूल हवामानातही चांगल्या प्रतीचे टोमॅटो मिळाल्याने शेतकऱ्यांना जास्त नफा मिळू शकतो..डॉ. भरत टेमकर, मो. ९४२२५ १९१४३उद्यानविद्या विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.