River Pollution : उजनी धरणातील प्रदूषित पाण्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांचे, जनावरांचे आणि जमिनीचेही आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत आपण केंद्र शासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे..केंद्रानेही महाराष्ट्र शासनाला अवगत केले असून, उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, याबाबत शासनच उदासीन असल्याचे मत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले..पंढरपूर श्रमिक पत्रकार संघामार्फत आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री. मोहिते-पाटील यांनी, पंढरपूर- सातारा, पंढरपूर- कुर्डुवाडी व माळशिरस- कुर्डुवाडी या केंद्रीय रस्त्यांची झालेली कामे व्यवस्थित न झाल्यामुळे व अर्धवट स्थितीत सोडून दिल्यामुळे आतापर्यंत २५ लोकांचे बळी गेले असून, याबाबत संबंधित ठेकेदारांना मार्च अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. .River Pollution Control : नदी प्रदूषणावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण.ही सर्व कामे मार्गी नाही लागली तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव दिला असून, त्याला मार्च अखेरपर्यंत मंजुरी मिळेल. पूर्वी चालू असलेली कृषी रेल्वे बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत पाठपुरावा चालू असून ही कृषी रेल्वे परत चालू करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, यामध्ये निम्मे डबे प्रवाशांसाठी आणि निम्मे डबे कृषी मालासाठी असणार आहेत. अकलूज, मेंढापूर आणि म्हसवड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या संदर्भातही पाठपुरावा चालू आहे..River Pollution: नद्या प्रदूषणमुक्तीसाठी पाण्यावर प्रक्रिया करू.पंढरपूर- लोणंद रेल्वेमार्गाचे सध्या मार्किंगचे काम पूर्ण झाले असून, लवकरच याबाबतचा पुढील निर्णय होऊन काम मार्गी लागेल. शक्तिपीठ महामार्गासाठी बाधित गावांचा दौरा करून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याबाबत मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. चौदा महिन्यांच्या आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रामध्ये समावेश करता आल्याचे समाधान असून, आज या माध्यमातून राज्यामध्ये केळी निर्यातीत सोलापूर जिल्ह्याचा वाटा ६७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. .याशिवाय विद्यार्थ्यांसाठीची एनएमएमएस शिष्यवृत्तीची तीस कोटींची थकीत रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांना मिळवून दिली. सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या कुर्डू येथील मुरूम उत्खननाच्या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी, शिवरायांच्या राज्यामध्ये महिला अधिकाऱ्यांवर आणला जाणारा दबाव आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.