Pune News: भिगवण- बारामती रस्त्यावर बेजबाबदारपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाढत असलेले अपघात रोखण्यासाठी भिगवण पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात या मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर व ट्रॉलींची कसून तपासणी करण्यात आली. त्यात १२ ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई केली..कारवाईदरम्यान अनेक ट्रॅक्टर व ट्रॉलींवर पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर व रेडिअम नसणे, वाहन क्रमांक नसणे, परवाना व कागदपत्रांचा अभाव, मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम लावून वाहन चालवणे, असे गंभीर प्रकार आढळून आले..Road Safety : विविध रस्त्यांवरील एकूण ९७ संभाव्य धोक्याची ठिकाणे अधिसूचित.याबाबत संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. बारामती ॲग्रो, तसेच इतर साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करताना चालकांना वाहन विमा, ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड आदी कागदपत्रे नेहमी सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या..Road Safety : ‘कृषी’चे विद्यार्थी शेती शिक्षणासह गिरविणार रस्ता सुरक्षिततेचे धडे.तसेच, दारू पिऊन वाहन चालवू नये, वाहन बिघाड झाल्यास रस्त्याच्या कडेला थांबवून टायरला स्टॉपर लावू नये, गरज भासल्यास ‘डायल ११२’वर संपर्क साधावा, अशा महत्त्वपूर्ण सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या..तसेच, वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे, त्यावर साखर कारखान्याचे नाव, चालकाचा संपर्क क्रमांक व रक्तगट नमूद करणे, चालकांनी रिफ्लेक्टर जॅकेटचा वापर करणे बंधनकारक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.