Wardha News : तेलंगण राज्यातील एक टोळके अनधिकृत कीटकनाशकांची विक्री करण्याच्या प्रयत्नात होते. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनंतर करण्यात आलेल्या कारवाईत अडीच लाख रुपयांचा अनधिकृत कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला. .हिंगणघाट ते सातेफळ मार्गावर दोन व्यक्ती एका कारमधून अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री करीत होते. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जात संबंधितांना त्यांच्या नाव, गावाची विचारणा केली. .Toxic Fruits Pesticides : जास्त कीटकनाशक फवारलेली फळे आरोग्यास कितपत हानिकारक?.त्यावेळी एकाने आपले नाव शंकर उशन्ना पालथ (वय ५०, रा. गुंडा, ता. जैनात, जि. आदिलाबाद) तर दुसऱ्या व्यक्तीने त्याचे नाव गिरीश लक्ष्मारेड्डी येल्टीवार (वय ४६, रा. शांतीनगर, आदिलाबाद, तेलंगण) असे सांगितले. .त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या कारची (क्र. टी.एस.०८-एचडी-४४९९) पोलिसांनी झाडाझडती घेतली. या कारच्या डिक्कीमध्ये औषधांच्या ९ खर्डाच्या खोक्यात बायो जेनेटिक प्रा. लि. हैद्राबाद (तेलंगण) या कंपनीच्या विविध कीटकनाशकांच्या बॉटल्स मिळून आल्या. या अनधिकृत कीटकनाशकांच्या साठ्याची किंमत तब्ब्ल अडीच लाख रुपये इतकी होती..Pesticide Buying Guide: किडनाशक खरेदीपूर्वी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी.त्यासोबतच ९ लाख रुपयांची कार व दोन मोबाइल असा एकूण ११ लाख ९५ हजार ६०३ रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईनंतर कृषी विभागाने आपल्यास्तरावर कारवाई केली. .यामध्ये जिल्हा भरारी पथकाचे शिवा जाधव, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी प्रमोद पेटकर, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) शुभ्रकांत भगत यांचा समावेश होता. पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे,गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस कर्मचारी मनोज धात्रक, महादेव सानप, पवन पन्नासे, अनुप कावळे, विनोद कापसे यांचा सहभाग होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.