Recruitment Controversy: नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील मेगाभरतीमध्ये शैक्षणिक पात्रतेतील विसंगतीमुळे उमेदवार नाराज झाले आहेत. वरिष्ठ पदासाठी केवळ पदवी पुरेशी असताना, कनिष्ठ पदासाठी पदव्युत्तर पात्रतेची अट ठेवल्याने पदवीधर उमेदवारांना अन्याय झाल्याची भावना आहे.