Nagpur News: सर्पदंश झाल्यानंतर तो विषारी साप आहे की नाही, हे तत्काळ ओळखण्यासाठी ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट किट’ थेट खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या किटच्या वापरामुळे विषारी सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेत ‘अँटी स्नेक व्हेनम’ देणे शक्य होणार आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे..या किटच्या उपलब्धतेमुळे गरज नसतानाही अँटी व्हेनम इंजेक्शन देण्याच्या प्रकारालाही आळा बसेल. नव्या तंत्रज्ञानामुळे सर्पदंशावर अचूक आणि वेळेत उपचार शक्य होणार आहेत. ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट किट’ ही बंगळुरू येथील एका कंपनीने विकसित केली आहे..Snake Awareness: जनजागृतीमुळे सापांना जीवदान.राज्यात वाढत असलेल्या सर्पदंशांच्या घटनांचा विचार करून राज्य सरकारने ६.१४ कोटी रुपयांच्या किट्स खरेदीला हिरवा कंदील दिला आहे. एका किटची किंमत सुमारे ५५७.५० रुपये आहे. एकूण १ लाख १० हजार २१३ किट्स खरेदी करण्यात येणार आहेत. ही किट नागपूरसह राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, तसेच ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्याची योजना आहे..Snake Bite : चांदवड तालुक्यात सर्पदंशाचा वाढता धोका.विषारी साप चावल्यावर दिसणारी लक्षणेविषारी साप चावल्यास चावलेल्या ठिकाणी तीव्र वेदना व सूज दिसून येते. चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे जाणवू शकतात. काही वेळा त्वचेचा रंग निळसर किंवा काळपट होतो, जखमेतून रक्तस्राव सुरू होतो, तसेच बोलण्यात अडचण येते. याशिवाय शरीर बधीर होणे, स्नायू कमजोर होणे किंवा अर्धांगवायूची भावना, अतिघाम येणे, तीव्र अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणेही दिसू शकतात. त्यामुळे तात्काळ वैद्यकीय उपचार घेणे व ‘अँटी स्नेक व्हेनम’ देणे अत्यंत आवश्यक आहे..सर्पदंश झाल्यानंतर तो विषारी की बिनविषारी आहे, हे त्वरित निश्चित करणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक ठरते. परिणामी, सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट किट’ प्रभावी ठरून सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्युदरांत निश्चित घट होईल.आशिष खाडे, संस्थापक अध्यक्ष, हेल्प फॉर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.