Solapur News: मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील २१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ केवळ पदभरती अभावी रखडला आहे. गावांची निवड होऊन एक वर्षाहून अधिक कालावधी उलटला, तरी या प्रकल्पासाठी मंजूर केलेली १२५७ पदे अद्याप रिक्तच आहेत. परिणामी, प्रकल्पाची अंमलबजावणी कागदावरच अडकली असून, शेतकऱ्यांना त्याचा थेट फटका बसत आहे..पोकरा प्रकल्पाचा टप्पा-१ यशस्वी ठरल्याने टप्पा-२ कडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, प्रशासनातील दिरंगाईमुळे सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय शेती, मृदा व जलसंधारण, फळबाग लागवड, हवामान-अनुकूल तंत्रज्ञान यासारखी कामे रखडली आहेत. कृषी विभागाच्या सूत्रानुसार, समूह सहायक, प्रकल्प सहायक, जिल्हा व विभाग नोडल अधिकारी अशा विविध पातळ्यांवरील १२५७ पदे शासन निर्णयाने मंजूर करण्यात आली आहेत..POCRA Scheme : पोकरातील गैरप्रकाराच्या प्रकरणाची चौकशी सुरूच .परंतु अद्याप या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरूच झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पासाठी मंजूर निधी खर्च होऊ शकलेला नाही, शिवाय प्रशिक्षण कार्यशाळा, शेततळे, ठिबक सिंचन योजना यासारख्या उपक्रमांना गती मिळालेली नाही. या योजनेसाठी दोन महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने जागतिक बँकेसोबत करारनाम्यास मान्यता दिली आहे. जवळपास ६ हजार कोटी रुपयांचा निधी यावर खर्च होणार आहे. पण सध्या केवळ काही जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म नियोजनाची प्रक्रिया सुरू आहे, पण अंमलबजावणी करणारे अधिकारीच नसल्याने प्रत्यक्ष कामांना विलंब होत आहे..POCRA Scheme Scam: ‘पोकरा’तील घोटाळा २०० कोटींहून अधिक.टप्पा-२ मध्ये समाविष्ट २१ जिल्हेछत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव आणि नाशिक..‘पोकरा’ प्रकल्पाचा पहिला टप्पा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला, त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निधीची तरतूदही झाली आहे. गावे निवडली आहेत. पण सरकार अंमलबजावणीत चालढकल का करत आहे, कळत नाही.अशोक पाटील-हुड, अध्यक्ष, राष्ट्रीय किसान परिषद, छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.