Akola News: केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण (PMFME) योजना ग्रामीण भागात आशादायी वातावरण तयार करण्यास कारणीभूत ठरू लागली आहे. .स्थानिक अन्नप्रक्रिया उद्योगांना नवसंजीवनी मिळते आहे. सन २०२० पासून कार्यान्वित झालेली ही योजना आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल या संकल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यास प्रभावी ठरत आहे. या योजनेत अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याने निधी खर्च करण्यात आघाडी घेतली आहे..PMFME Scheme : ‘पीएमएफएमई’अंतर्गत ३०२ प्रस्ताव मंजूर .देशातील असंघटित अन्नप्रक्रिया लघुउद्योगांना बळकट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे खाद्यतेल, मसाले, फळप्रक्रिया तसेच पारंपरिक खाद्यपदार्थांना बाजारपेठेत योग्य स्थान मिळू लागले आहे..परिणामी, ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळाली असून या उत्पादनाला चांगला दर मिळण्यास हातभार लागतो आहे. विशेष म्हणजे अमरावती विभागात आजवर सुमारे ६० कोटी रुपयांचे अनुदान वितरित झाले आहे. यात बुलडाणा जिल्हा आघाडीवर म्हणजेच या ठिकाणी सुमारे २९ कोटी १४ लाखांचा निधी जिल्ह्याने खर्च केला आहे..ही योजना वैयक्तिक उद्योजक, शेतकरी उत्पादक संघटना (FPO), स्वयंसाह्यता गट आणि सहकारी संस्थांसाठी आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ३५ टक्क्यांपर्यंत, कमाल १० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. लाभार्थ्यांनी किमान १० टक्के स्वभांडवल गुंतवणे आवश्यक असून, उर्वरित रक्कम बँक कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होते..PMFME Scheme: ‘पीएमएफएमई’ योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पुढे या.सामायिक पायाभूत सुविधांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा कमाल ३ कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तसेच स्वयंसाह्यता गटातील प्रत्येक सदस्याला उद्योग सुरू करण्यासाठी १० हजार रुपयांचे बीजभांडवल दिले जाते. याशिवाय उत्पादन पॅकेजिंग, गुणवत्ता नियंत्रण, ब्रँडिंग व मार्केटिंग याबाबत प्रशिक्षण, तांत्रिक साह्य आणि मार्गदर्शन पुरविले जाते. या योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे लागते..शिक्षणाची अट नाही तसेच पूर्वव्यवसाय अनुभव आवश्यक नाही. उद्योगामध्ये १० पेक्षा कमी कामगार असणे अपेक्षित आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, जागेचा करार, बँक स्टेटमेंट, ना हरकत प्रमाणपत्र व स्थानिक प्रशासनाची परवानगी ही आवश्यक कागदपत्रे आहेत..बुलडाणा आघाडीवरअमरावती विभागात योजनेचा उल्लेखनीय प्रभाव दिसून येत आहे. आतापर्यंत २,९३८ प्रकल्प सुरू झाले असून त्यांना अनुदान वितरित झाले आहे, तर १,२१३ प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत. एकूण ६० कोटी ९९ लाख रुपयांचे अनुदान विभागात वितरित करण्यात आले आहे. यामध्ये बुलडाणा जिल्हा अग्रेसर असून तेथे २९.१४ कोटी रुपये वितरित झाले आहेत. त्याखालोखाल अकोला १०.७९ कोटी, अमरावती ९.५० कोटी, यवतमाळ ६.२६ कोटी आणि वाशीम ५.२९ कोटी रुपये अनुदान वितरित झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.