PM Narendra Modi launches PM Dhan Dhanya Krishi Yojana and Pulses Mission : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.११) शेतीसाठीच्या ४२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या योजनांचा शुभारंभ केला. यात प्रामुख्याने पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना आणि कडधान्ये आत्मनिर्भरता अभियानाचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामीण समृद्धीच्या दिशेने वाटचाल करण्याचा मोदी सरकारचा उद्देश आहे. यातील पंतप्रधान धन- धान्य कृषी योजनेवरील खर्च २४ हजार कोटी रुपये आहे. पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीतील पूसा येथील एनएएससी कॉम्प्लेक्स येथून या योजनांच्या शुभारंभ केला. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते..पंतप्रधान मोदी यांनी यावेळी संबोधित करताना म्हटले की, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी पंतप्रधान कृषी धन-धान्य योजना आणि कडधान्ये आत्मनिर्भरता अभियान या योजना आम्ही सुरु करत आहोत. या योजना कोट्यवधी शेतकऱ्यांचे भविष्य बदलण्याचे काम करतील. या दोन योजनांसाठी सुमारे ३५ हजार कोटींहून अधिक खर्च करणार आहोत. मी सर्व शेतकऱ्यांना या योजनांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. .PM Dhan Dhaanya Krishi Yojana: पीएम धन-धान्य कृषी योजनेसाठी देशातील १०० जिल्ह्यांची निवड, महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?.''शेती आणि शेतकरी हे नेहमीच आपल्या विकास प्रवासातील एक भाग राहिले आहेत. बदलत्या काळानुसार शेती आणि शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळत राहणे खूप महत्वाचे आहे. परंतु दुर्दैवाने, मागील सरकारांनी शेती आणि शेतकऱ्याला त्यांच्या परिस्थितीवर सोडून दिले. त्यामुळे भारताची शेती व्यवस्था सातत्याने कमकुवत होत गेली. २१ व्या शतकातील भारताला वेगाने विकास करण्यासाठी शेती व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक होते आणि हे काम २०१४ नंतर सुरू झाले,'' असे मोदी म्हणाले..PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांना आज मिळणार ४२ हजार कोटींची भेट.आजपासून कडधान्ये आत्मनिर्भरता अभियान सुरु होत आहे. हे केवळ कडधान्यांचे उत्पादन वाढवण्याचे अभियान नाही तर आपल्या भावी पिढ्यांना सक्षम बनवण्याचे अभियानदेखील आहे. गेल्या ११ वर्षांपासून, सरकार शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. पंतप्रधान धन-धन कृषी योजनेसाठी १०० जिल्ह्यांची निवड तीन निकषांवर आधारित केली आहे. पहिला निकष म्हणजे, शेतीमधून किती उत्पन्न मिळते. दुसरा, एका शेतीत किती वेळा लागवड केली जाते आणि तिसरा निकष म्हणजे, शेतकऱ्यांना कर्ज अथवा गुंतवणुकीची किती सुविधा आहे. या योजनेत, आम्ही ३६ सरकारी योजना जोडत असल्याचे पीएम मोदी म्हणाले.गेल्या ११ वर्षात भारताची शेतमाल निर्यात सुमारे दुपटीने वाढली आहे. धान्य उत्पादनात सुमारे ९०० लाख मेट्रिक टनांची वाढ झाली आहे. फळे आणि भाजीपाला उत्पादनात ६४० लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. आज, भारत दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आम्ही शेतकरी हिताच्या दृष्टीने, बियाण्यांपासून ते बाजारपेठांपर्यंत सुधारण्या केल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. .बीडमधील शेतकरी महिलेचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरवयावेळी नैसर्गिक शेतीशी जोडलेल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील महिला शेतकरी वनमालाबाई तुकाराम बोरकर आणि अशोक कल्याणराव पठाडे यांचा पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. देशातील इतर राज्यांतील प्रयोगशील शेतकऱ्यांनाही गौरविण्यात आले. .दरम्यान, दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेतील एका विशेष कृषी कार्यक्रमात सहभाग होत पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.