PM Modi on Public Participation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २६) ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३६व्या भागात देशाच्या विविध भागांतील प्रेरणादायी उपक्रम आणि व्यक्तींच्या कार्याचा गौरव केला. मणिपूरमधील खगोलशास्त्रज्ञ, बिहारमधील ‘वेस्ट टू वेल्थ’ उपक्रम, उत्तर प्रदेशातील महिला बचत गट, गुजरातमधील पर्यावरण संवर्धन, केरळमधील संस्कृत शिक्षणातील नवकल्पना, तसेच त्रिपुरा आणि काश्मीरमधील पारंपरिक कला-संस्कृती जपण्याच्या प्रयत्नांचा त्यांनी विशेष उल्लेख केला..मणिपूरचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. रोनाल्डो लैश्राम हे जपानमध्ये कार्यरत असून, तरुण आकाशगंगांच्या मोठ्या समूहाच्या शोधात सहभागी होते. या समूहाला मणिपूरमधील प्रसिद्ध लोकटक सरोवराच्या नावावरून ‘लोकटक प्रोटो-क्लस्टर’ असे नाव देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले..PM Modi: पेपरफुटी प्रकरणांची जलदगती न्यायालयांत सुनावणी, पंतप्रधान मोदींची घोषणा.बिहारमधील सीतामढी येथे प्लॅस्टिक कचऱ्यापासून सार्वजनिक ठिकाणी वापरण्याकरिता मजबूत आणि पर्यावरणपूरक बाक तयार करण्याच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. एका बाकासाठी सुमारे ४० किलो सिंगल-यूज प्लॅस्टिक वापरले जाते. हे बाक शाळा, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात येत असून, पर्यावरण संवर्धनासोबतच स्थानिक रोजगारालाही चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले..PM Modi: पंतप्रधान मोदींचा 'एफएओ'च्या 'ॲग्रिकोला मेडल'नं सन्मान.गुजरातमधील गीर अभयारण्यात जवळपास सहा दशकांनंतर भारतीय राखाडी धनेश (इंडियन ग्रे हॉर्नबिल) पुन्हा घरटी बांधताना दिसत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. धनेश पक्षी जंगलातील फळांच्या बिया दूरवर पसरवून वनसंवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावतो, असे त्यांनी स्पष्ट केले..अहमदाबादमधील भैज परिसरात एका तासात साडेतीन लाखांहून अधिक रोपांची लागवड करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी या उपक्रमात २५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाल्याचे सांगितले. या विक्रमाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. काश्मीरमधील पारंपरिक ‘वागू’ चटई तयार करण्याची कला जपण्यासाठी श्रीनगरचे गुलाम हुसेन आणि त्यांची कन्या तन्झिला यांनी केलेल्या प्रयत्नांचाही पंतप्रधानांनी या कार्यक्रमात उल्लेख केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.