Amravati News: मोठ्या गाजावाजात घोषणा झालेला नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील ‘पीएम मित्रा मेगा टेक्स्टाईल पार्क’ प्रकल्प पायाभूत सुविधांअभावी दोन वर्षांपासून कागदावरच अडकून पडला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे..मार्च २०२३ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी १०२० एकर जागा निश्चित करण्यात आली होती. सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ आणि तीन लाख रोजगारांच्या संधींची निर्मिती, अशी आश्वासने यावेळी देण्यात आली होती. ‘फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन’ (फाइव्ह एफ) या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प नांदगावपेठजवळील पिंपळविहीर परिसरात साकार होणार आहे..Textile Park: यवतमाळ जिल्ह्यातील टेक्स्टाईल पार्कला मिळेना गती.मात्र दोन वर्षांनंतरही प्रत्यक्षात कामाची मुहूर्तमेढ रोवली गेलेली नाही. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ७०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पार्कचे मार्केटिंग करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. अनेक मोठे ब्रँड अमरावतीत येतील, अशी अपेक्षा होती..प्रत्यक्षात मात्र उद्योग उभारणीची गती अत्यंत मंद असून, अद्याप एकाही नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. दरम्यान, प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या २२० केव्ही सबस्टेशनच्या उभारणीस सुरूवात झाली असली तरी कामाचा वेग पाहता तेही कधी अस्तित्वात येईल, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे..Textile Industry: येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार अधिक चालना.दरांबाबत नाराजीटेक्स्टाईल झोनमधील सेंट्रल ॲफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅंटचे (सीईटीपी) दर जास्त असल्याने उद्योजकांमध्ये नाराजी आहे. दर काही प्रमाणात कमी करण्यात आले असले, तरी ते पुरेसे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे..अमेरिकेच्या धोरणांमुळे टेक्स्टाईल क्षेत्रातील गुंतवणूक थांबली आहे. २२० केव्ही सबस्टेशनच्या कामाला आता सुरुवात झाली आहे.”किरण पातूरकर (अध्यक्ष, एमआयडीसी इंडस्ट्रिअल असोसिएशन).मेगा टेक्स्टाईल पार्कमध्ये उद्योग न येण्यास राज्य शासन जबाबदार आहे. हा मुद्दा लोकसभेत मांडण्यात येईल.बळवंत वानखडे (खासदार, अमरावती).विदर्भातील उद्योगांसाठी मुंबई–पुण्यापेक्षा वेगळ्या व अधिक सवलती आवश्यक आहेत. कागदावरील सवलती प्रत्यक्षात उतरल्या पाहिजेत. वीरेंद्र लढ्ढा (अध्यक्ष, सातूर्णा औद्योगिक वसाहत).हा पार्क अमरावतीचा कायापालट करू शकतो. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा रेटा गरजेचा आहे.विजय जाधव (उद्योजक).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.