PM Kisan Yojana: आसाममध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत निधीच्या कथित अपहाराचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी करत अमगुरी नवनिर्माण समिती (एएनएस) ने सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांचा हा तक्रार अर्ज आता पुढील चौकशीसाठी राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने कृषी विभागाचे आयुक्त आणि सचिवांकडे वर्ग केला आहे. .या पत्रात नमूद केलेल्या मुद्यांबाबत दक्षता संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोणतीही चौकशी अथवा पडताळणी केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी एएनएसने पंतप्रधान कार्यालयाकडे धाव घेत, ५६७ कोटी रुपयांच्या कथित पीएम किसान योजनेशी संबंधित अपहाराची निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. ही चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) अथवा सीबीआय मार्फत करण्यात यावी आणि संबंधित कृषी विकास अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते. या प्रकरणी समितीने सीबीआयला पत्र पाठवून चौकशीची मागणी केली होती..PM Kisan Yojana: १ फेब्रुवारी २०१९ नंतर शेती घेतलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार 'पीएम किसान'चा लाभ- कृषिमंत्री भरणे .सीबीआयकडे दाखल केलेल्या तक्रारीत एएनएसने नमूद केले आहे की आसाममध्ये केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीत सहभागी असलेल्यांनी सुमारे ८ लाख ४४ हजार ६७२ इतकी बोगस नोंदणी केली आणि यातून सुमारे ५६७ कोटी रुपयांची फसवणूक केली. कृषी अधिकाऱ्यांनी राज्यातील ३३ जिल्ह्यांमधून ८ लाख ४४ हजार ६७२ बनावट शेतकऱ्यांची निवड केली होती..PM Kisan Scheme: शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीत पेच.एएनएसने सीबीआयला सांगितले की शेतकऱ्यांसाठी असलेल्या निधीच्या मोठ्या प्रमाणात अपहार करुनही राज्य सरकारने संबंधित कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. राज्य सरकारने नुकत्याच काही जिल्ह्यांत केलेल्या तपासणीत ९८ कृषी विकास अधिकाऱ्यांची नावे समोर आली होती. संबंधित कृषी विकास अधिकाऱ्यांची नावे उघड झाल्यानंतरही राज्य सरकारने त्यांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही, असे एएनएसने तक्रारीत म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.