Nanded News: रब्बी हंगाम २०२५-२६ साठी पंतप्रधान पीकविमा योजना नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ७२४ अर्जांची विमा नोंदणी झाली आहे. विमा योजनेत सहभागी घेण्यासाठी रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, गहू व हरभरासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. .भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून रब्बीमध्ये पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये बागायती गहू, रब्बी ज्वारी व हरभरा या पिकांसाठी विमा भरता येणार आहे. एक नोव्हेंबरपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. आजपर्यंत यात ७२४ अर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. यात सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. पीकविमा नुकसान भरपाईसाठी, ई-पीक पाहणीअंतर्गत पीक पेरा नोंद करणे बंधनकारक राहील. .Crop Insurance: पीकविमा काढण्यासाठी‘फार्मर आयडी’ अनिवार्य.यात बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्तावाची पत्रे भरून विमा हप्ता रकमेसह सादर करावी. विमा योजनेअंतर्गत जोखमीअंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अटी व शर्तींच्या अधिन राहून निश्चित केली जाते. पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करून हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे. .अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे, पीकविम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येते. विभा भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नसल्याने शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले..पीक विमा संरक्षित रक्कम विमा हप्ता अंतिम तारीखबागायती गहू ४५,००० ४५० १५ डिसेंबररब्बी ज्वारी ३६,००० ३६० ३० नोव्हेंबरहरभरा ३६,००० ३६० १५ डिसेंबरपीकनिहाय विमा लागू असलेले तालुके.Crop Insurance 2025: रब्बी हंगाम २०२५ साठी पिक विमा अर्ज कसा करावा? | संपूर्ण प्रकिया.पीकनिहाय विमा लागू असलेले तालुकेहरभरा :नांदेड, अर्धापूर, बिलोली, मुदखेड, उमरी, कंधार, लोहा, माहूर, हिमायतनगर, हदगाव, देगलूर, मुखेड, भोकर, नायगाव, धर्माबाद व किनवट.गहू (बागायती) :नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, .भोकर.रब्बी ज्वारी (जिरायती) :बिलोली, धर्माबाद, मुखेड, देगलूर, नायगाव, नांदेड, किनवट व हदगाव.पीकविमा योजनेत सहभागासाठी आवश्यक कागदपत्रेआधार कार्डबँक पासबुकपीकपेरा स्वंय घोषणापत्रशेतकरी ओळखपत्र क्रमांकपेरा नोंदलेला सात-बारा, आठ (अ).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.