Sangli News : शासनाने पंतप्रधान पीक विम्यासाठी मुदतवाढ दिली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ४६० शेतकऱ्यांनी पीकविमा घेत ५७ हजार २१५ हेक्टरवरील पिकांना संरक्षित केले आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली..शासनाने अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे खरीप हंगामातील विविध पिकांसाठी पंतप्रधान पीकविमा ही योजना सुरू केली आहे. या योजनेची मुदत जुलै अखेर होती. अनेक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता आले नाही..Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात.त्यामुळे योजनेची मुदत वाढवावी अशी मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे शासनाने १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. जिल्ह्यात जुलैअखेर ८१ हजार ०६८ शेतकऱ्यांनी विमा घेत ४० हजार १२१ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले..विम्याला मुदत वाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. गेल्या तेरा दिवसांत ३४ हजार ५५४ शेतकऱ्यांनी विम्यात सहभागी होत १७ हजार ९४ हेक्टरवरील पिके संरक्षित केली आहेत. जिल्ह्यात ५९१ कर्जदार तर बिगर कर्जदार १ लाख १४ हजार ८६९ असे एकूण १ लाख १५ हजार ४६० शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे. विम्यात सहभागी होण्याची अंतिम मुदत गुरुवारअखेर (ता. १४) आहे. त्यामुळे आजच्या दिवसात किती शेतकरी सहभागी होतील, याचा अहवाल शुक्रवारपर्यंत (ता. १५) तयार होईल..Crop Insurance Scheme : बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत.गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांचा सहभाग कमीचगतवर्षी शासनाने शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा योजना सुरू केली होती. त्यामुळे गतवर्षीच्या खरीप हंगामात ३ लाख ६१ हजार ४३९ शेतकऱ्यांनी पीकविमा घेत १ लाख ७६ हजार ७०० हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले होते. .मात्र, यंदा शासनाने एक रुपयात पीकविमा योजना बंद केली आहे. प्रत्येक पिकासाठी हेक्टरी रक्कम निश्चित केली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा विम्याला प्रतिसाद कमी मिळाला असल्याचे चित्र आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.