Amravati News: विदर्भातील प्राचीन आणि प्रसिद्ध बहीरम यात्रा महोत्सवाची आढावा बैठक अचलपूर उपविभागीय अधिकारी (एसडीओ) बळवंत अरखराव यांच्या अध्यक्षतेखाली बहिरम येथील मंदिर संस्थान सभागृहात पार पडली. यावेळी एसडीओ अरखराव यांनी परिसराची स्वच्छता, आरोग्य, माकडांचा बदोबस्त, गर्दी यासह पार्किंगवर विशेष लक्ष देण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश दिले..विदर्भात सर्वांत अधिक काळ चालणारी बहिरम यात्रा २० डिसेंबरपासून प्रारंभ होत असून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत चालेल. यादरम्यान यात्रेत स्वच्छता ठेवण्यासंबंधी घंटागाडी नियमित फिरणार असून कचरा करणाऱ्या व्यापारी अथवा यात्रेकरुंना दंड ठोठावला जाणार आहे. तसेच मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या अंगावर येणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना वनविभागाला देण्यात आल्याची माहिती आहे..Bahiram Yatra : बहिरम यात्रेस आजपासून प्रारंभ.दरम्यान, यात्रामहोत्सव यंदा शंभरपेक्षा अधिक दिशादर्शक आणि माहिती सांगणारे फलक असणार आहेत. शिवाय आरोग्यकेंद्र पोलिस ठाणे व मंदिर संस्थानाची स्वतंत्र चमू यात्रेकरुंच्या मदतीसाठी सज्ज असणार आहे. बहिरम यात्रा नियंत्रक कक्षात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे नाव आणि मोबाइल क्रमांकाची यादीसुद्धा यावेळी उपलब्ध राहील..Bahiram Yatra : बहिरम यात्रेचा बिगुल वाजला.मोबाइल नेटवर्कविषयी तक्रारमोबाइल नेटवर्क जाम होत असल्याची तक्रार गतवर्षी जाणवली होती. त्यामुळे यात्रेत मोबाइल सेवा काम करीत नाही. संपर्क होत नाही. तेव्हा मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपनीला याबाबत कळविणार असल्याचे बैठकीत निश्चित झाले आहे..तसेच खरपी, करजगाव, सर्फापूर फाटा, शिरजगावकसबा, ब्राम्हणवाडा थडी रस्त्यांचे सिंमेट बांधकाम सुरू असल्याने त्या रस्त्याने येणाऱ्या भाविकांसाठी दिशादर्शक फलक लावण्याची सुविधा संबंधित कंत्राटदाराने करावी, अशी सूचना देखील देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.