Water Conservation: भविष्यात वितरिकेतून खुले पाणी सोडणे बंद करून शेतीला बंदिस्त पाइपद्वारे पाणीपुरवठा करण्याचे धोरण राज्य शासनाने आखले आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली..पैठण येथील संतपीठमध्ये बुधवारी (ता. ८) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मराठवाड्यातील जलव्यवस्थापन, सिंचन क्षमता वाढविणे, तसेच आगामी दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी उपस्थित अनेक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली..Hydroponic System: वनामकृवित आयओटी आधारित स्मार्ट हायड्रोपोनिक प्रणाली कार्यान्वित.त्यावर श्री. विखे म्हणाले, की जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या लायनिंगसाठी सध्या सुमारे ७५० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. २०८ किलोमीटर लांबीच्या या कालव्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू होईल. संपूर्ण कालव्याचे लायनिंग करण्यासाठी सुमारे २५०० ते ३००० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून देऊ..Irrigation Water Issue: गाळामुळे गडहिंग्लजला पाटबंधारे लघू प्रकल्पातील साठा अल्प.जायकवाडी नाथसागर धरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त धरणाच्या कोनशिला पूजनाचा कार्यक्रमही श्री. विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला. येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्राची दखल घेत त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्याचेही आदेश त्यांनी या वेळी दिले..अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली आणा ः भुमरेपैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शिल्लक पाण्याचे सर्व्हेक्षण करून अतिरिक्त २५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची गरज पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी या वेळी व्यक्त केली. यापूर्वी मंजूर झालेल्या अनेक कामांच्या निविदा अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे प्रकल्प पूर्णत्वास जात नसल्याची तक्रारही त्यांनी या वेळी केली. खेर्डा, पाचोड पंपिंग मशिनरी, कालवा क्रमांक २ ची उर्वरित कामे, तसेच भाग १ व २ मधील गेट्सची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.