Petrol Diesel Prices Hiked By Rs 3 Per Litre: मध्य पूर्वेतील संकट आणि जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीची थेट झळ भारताला बसली आहे. देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी (दि. १५) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली. हे नवे वाढीव दर देशभरात तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे..दिल्लीत ३ रुपयांच्या दर वाढीनंतर आता पेट्रोलचा दर प्रति लिटर ९७.७७ रुपयांवर पोहोचला. तर डिझेल प्रति लिटर ९०.६७ रुपयांवर गेले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात सर्वाधिक वाढ झाली. येथे पेट्रोलची विक्री ३.२९ रुपयांच्या वाढीसह प्रति लिटर १०८.७४ रुपये होईल. तर मुंबईत पेट्रोलचा दर ३.१४ रुपयांनी वाढून प्रति लिटर १०६.६८ रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नई हा दर २.८३ रुपयांच्या वाढीसह प्रति लिटर १०३.६७ रुपयांवर गेला..डिझेल दरांमध्येही अशाचप्रकारे वाढ दिसून आली आहे. कोलकातामध्ये डिझेलचा दर ३.११ रुपयांनी वाढून प्रति लिटर ९५.१३ रुपये झाला आहे. मुंबईत डिझेल ३.११ रुपयांनी महागले असून येथे दर प्रति लिटर ९३.१४ रुपयांवर पोहोचला. चेन्नईत डिझेलचा दर २.८६ रुपयांनी वाढून ९५.२५ रुपये झाला..Fuel and Fertilizer Prices: इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार.सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढत्याचबरोबर, दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ झाली आहे. हा दर आता प्रति किलो ७९.०९ रुपयांवर पोहोचला आहे. याआधी, महानगर गॅस लिमिटेडने मुंबई विभागात सीएनजीचा दर २ रुपयांनी वाढवला होता..Ethanol Blended Petrol: केंद्राचे मोठे पाऊल; पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉल मिश्रण, मसुदा जारी.भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार देश आहे. पण होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. यामुळे मालवाहतूक, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन खर्च महागला आहे. याचा इंधन विक्रेत्यांवर आणि विविध क्षेत्रांतील उत्पादकतेवर दबाव निर्माण झाला आहे..इराणमधील युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणावामुळे जगभरात होणारा ऊर्जा पुरवठा ठप्प झाला आहे. असे असतानाही देशात इंधन टंचाई नसल्याचे केंद्र सरकारकडून अनेकवेळा सांगण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.