Petrol Diesel Price Today: सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा झटका बसला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी (दि. २३ मे) पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ८७ पैशांची वाढ केली. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ९१ पैशांची वाढ झाली. विशेष म्हणजे अवघ्या आठ दिवसांत झालेली ही तिसरी इंधन दरवाढ आहे..मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली असून, यामुळे होणारा तोटा भरून काढण्याचा सरकारचा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मुख्य म्हणजे खरीप हंगामापूर्वी डिझेल महागल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे..या आठवड्याच्या सुरुवातीला १९ मे रोजी पेट्रोल- डिझेल दरात प्रति लिटर ९० पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी १५ मे रोजी प्रति लिटर ३ रुपये वाढ झाली होती. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, सरकारी तेल विपणन कंपन्यांचे (OMCs) म्हणणे आहे की, त्यांना दर महिन्याला जवळपास १ हजार कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागत आहे..Petrol Diesel Shortage: पेट्रोल- डिझेलचा साठा, मग पंपांवर रांगा का?; मुख्यमंत्री फडणवीसांनी खरं कारण सांगितलं .सीएनजी दरात वाढदरम्यान, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) नेदेखील सीएनजीच्या (CNG) च्या दरात प्रति किलो १ रुपयांची वाढ केली आहे. गेल्या १० दिवसांत सीएनजी तिसऱ्यांदा महागला आहे. नव्या दरवाढीमुळे, दिल्लीमध्ये सीएनजीचा दर वाढून प्रति किलो ८१.०९ रुपयांवर पोहोचला आहे. तर नोएडा आणि गाझियाबाद येथील ग्राहकांना तो प्रति किलो ८९.७० रुपयांला विकत घ्यावा लागणार आहे. .Petrol Diesel Price Hike: सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले! पेट्रोल, डिझेल दरात अवघ्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा वाढ.दरम्यान, देशात पेट्रोल- डिझेलची टंचाई असल्याने पंपांवर वाहनचालकांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. यावर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने, देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लोकांनी पॅनिक होऊन अतिरिक्त खरेदी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. .शुक्रवारी उशिरा पेट्रोलियम मंत्रालयाने एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सध्या इंधनाची मागणी अधिक असून, अशा परिस्थितीत प्रत्येकाला इंधन मिळावे यासाठी त्याचा जबाबदारीने वापर करावा आणि त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे..मोठ्या शहरातील पेट्रोलचे दर (प्रति लिटर)दिल्ली- ९९.५१ रुपये (८७ पैसे वाढ)कोलकाता- ११०.६४ रुपये (९४ पैसे वाढ)मुंबई- १०८.४९ रुपये (९० पैसे वाढ)चेन्नई- १०५.३१ रुपये (८२ पैसे वाढ).डिझेलचे दरदिल्ली- ९२.४९ रुपये (९१ पैसे वाढ)कोलकाता- ९७.०२ रुपये (९५ पैसे वाढ)मुंबई- ९५.०२ (९४ पैसे वाढ)चेन्नई- ९६.९८ (८७ पैसे वाढ)मध्यपूर्वेत संघर्ष कायम आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलही महागले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.