Pune News: शेतकऱ्यांना विकल्या जाणाऱ्या निविष्ठा अप्रमाणित आढळल्यानंतर फौजदारी कारवाईत विक्रेत्यांना अकारण आरोपी केले जात आहे, अशी तक्रार ‘माफदा’ने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. या समस्येवर लवकरच खात्यांतर्गत बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे. .महाराष्ट्र फर्टिलायझर डीलर्स असोसिएशनच्या (माफदा) प्रतिनिधींसमवते श्री. भरणे यांनी मंगळवारी (ता. २३) चर्चा केली. ‘राज्यभर निविष्ठांची तपासणी सतत होत असते. मात्र, नमुना अप्रमाणित निघाल्यानंतर पोलिस कारवाईच्या यादीत निविष्ठा उत्पादक कंपनीबरोबर विक्रेत्याचेही नाव घुसवले जाते. .Agriculture Input Act : कृषी विभागाचा प्रस्ताव ‘माफदा’ला अमान्य.मुळात, उत्पादनाशी विक्रेत्याचा काहीही संबंध नसतो. कंपनीकडून आम्हाला वेष्टनसहित उत्पादन पाठवले जाते व त्याची विक्री आम्ही वेष्टन न उघडता शेतकऱ्याला करतो. आरोपी म्हणून केवळ उत्पादकाचे नाव असावे व विक्रेत्याला साक्षीदार करावे,’ असा मुद्दा ‘माफदा’चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी मांडला..कृषी विभागाचे निरीक्षक राज्यभर निविष्ठा विक्री केंद्रांना भेटी देतात. या वेळी तपासणीसाठी निविष्ठांचे नमुने म्हणून पूर्ण उत्पादन (प्रॉडक्ट) ताब्यात घेतले जाते. नियमानुसार, तपासणीसाठी कोणतेही उत्पादन संबंधित निरीक्षकाने घेतल्यानंतर शासनाने त्याचे मूल्य चुकते करायला हवे. परंतु, २००२ पासून एकाही प्रकरणात विक्रेत्यांना त्यांच्या मालाचे मूल्य देण्यात आलेले नाही. .MAFPDA Protest: सरसकट बंद मागे न घेतल्याचा ‘माफदा’चा खुलासा .यामुळे राज्यभरातील विक्रेत्यांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी कृषी विभागाकडे असल्याचा मुद्दा या चर्चेत उपस्थित करण्यात आला. कृषिमंत्र्यांनी विविध समस्यांची माहिती घेत निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणींबाबत स्वतंत्र बैठक लवकरच घेण्याचे आश्वासन दिले..चर्चेत ‘माफदा’चे सरचिटणीस विपीन कासलीवाल, शशांक शाह, मनोज वेद, राजन मामनिया (सातारा), रवी शेंडे (वर्धा), समीर ठाकरे (ठाणे), आशिष पाटील (पालघर), प्रशांत पाटील (कराड), प्रशांत पोळ (वाई), हेमंत सिंगेवार (कल्याण), शरद कुलकर्णी (पुणे) यांनी भाग घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.