Washim News: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी), पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) व पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) यांसह विविध शासन पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित सर्व कर्जप्रकरणे तात्काळ निकाली काढावीत व १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बँकांना दिले..जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली शासन पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला. यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक यशवीर कुमार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पूनम घूले, कृषी उपसंचालक हिना शेख यांच्यासह विविध राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते..Employment Generation : पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागात रोजगारनिर्मितीला बळ.सीएमईजीपी,पीएमईजीपी व पीएमएफएमई योजनांतून सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक व नवउद्योजकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले..Employment Generation : शेतकऱ्यांच्या रोजगारनिर्मितीसाठी वृक्षलागवडीचा संकल्प.सीएमईजीपी अंतर्गत ३४९ प्रकरणांना मंजुरीसीएमईजीपी अंतर्गत आतापर्यंत ३४९ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. पीएमईजीपी अंतर्गत २१ पैकी सर्व २१ उद्दिष्टे पूर्ण करण्यात आली असून योजना यशस्वी ठरली आहे. .पीएमएफएमई अंतर्गत प्राप्त २८७ प्रकरणांपैकी १०८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून उर्वरित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करून नियमित अद्ययावत माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.