Solapur Farmers: पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आलेला असतानाच मागील गळीत हंगामातील ऊसबिलांची थकबाकी शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालत आहे. साखर आयुक्तालयाच्या १५ जुलैअखेरच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांकडे अंतिम दरानुसार ३६३ कोटी रुपयांची ऊसबिले अद्याप थकीत आहेत. .त्यातच सहा कारखान्यांकडे ६१ कोटी रुपयांची एफआरपीही प्रलंबित आहे. जिल्ह्यातील ३५ साखर कारखान्यांनी मागील हंगामात एक कोटी ६३ लाख ३७ हजार २१० टन उसाचे गाळप केले. त्यापोटी शेतकऱ्यांना ४ हजार ३३७ कोटी रुपये अदा करण्यात आले. मात्र, अंतिम दरानुसार संपूर्ण ऊसबील देणाऱ्या कारखान्यांची संख्या केवळ १२ आहे..Sugarcane Payments Pending: सोलापूर जिल्ह्यात तब्बल ३९२ कोटींची ऊसबिले थकीत .उर्वरित २३ कारखान्यांकडून शेतकऱ्यांची मोठी रक्कम अद्याप मिळालेली नाही. थकीत ऊसबिलांच्या वसुलीसाठी प्रशासनाने गोकूळ शुगर (धोत्री), भीमा आणि संत कुर्मदास साखर कारखान्यांविरोधात आरआरसी कारवाई सुरू केली आहे. मात्र, काही कारखाने कारवाई टाळण्यासाठी केवळ एफआरपीची पूर्तता करीत असून, अंतिम दरानुसार शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम देण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून होत आहे..Gokul Sugar News: ‘गोकुळ शुगर’कडून शेतकऱ्यांना ऊसबिलाच्या धनादेशाचे वाटप .जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, मशागत, कर्जफेड आणि घरखर्चासाठी मागील हंगामातील ऊसबिलांची मोठी अपेक्षा आहे. मात्र, हीच रक्कम थकीत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे..दरम्यान, अनेक कारखान्यांनी संपूर्ण ऊसबिले अदा केल्याची चुकीची माहिती साखर विभागाला दिल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. याबाबत साखर आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले असून, त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.